03 April 2020

News Flash

विठ्ठल मूर्तीचे शास्त्रीय पद्धतीने संवर्धन होणार

मंदिर समितीचा निर्णय

(संग्रहित छायाचित्र)

लाखो वैष्णावांचे श्रद्धास्थान असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीला लेप लावत शास्त्रीय पद्धतीने संवर्धन करण्यात येणार असून यासाठी वारकरी सांप्रदायातील मंडळी आणि पुरातत्त्व विभागातील अधिकाऱ्यांची लवकरच एक संयुक्त बैठक घेतली जाणार असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ  महाराज औसेकर यांनी दिली.

विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची झिज होत असल्याची तक्रार सध्या मोठय़ा प्रमाणात होऊ लागली आहे. याविषयी औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर समितीची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत काही महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले आहेत. यामधे प्रामुख्याने, विठोबाच्या मूर्तीचे संवर्धन व्हावे. तसेच यासाठी पुरातत्त्व खात्यास लेप लावण्यास परवानगी देण्यात आली आहे.

या लेप(इपॉक्सी कोंटींग) लावण्यापूर्वी याविषयी वारकरी सांप्रदायातील मंडळी आणि पुरातत्त्व विभागातील अधिकाऱ्यांची लवकरच एक संयुक्त बैठक घेतली जाणार आहे. हे करताना वारकरी मंडळींना विश्वासात घेतले जाणर आहे. या बाबत विधी व न्याय विभागाची मान्यता घेतली जाणार असल्याचे औसेकर महाराज यांनी सांगितले.

या बैठकीला मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, सदस्य आमदार राम कदम,आमदार सुरजितसिंह ठाकूर गैरहजर होते. मात्र आचारसंहिता लागण्याआधी समितीने बैठीकीचा सोपस्कार पूर्ण केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2019 1:51 am

Web Title: vitthal idol will be scientifically enhanced abn 97
Next Stories
1 “शिवछत्रपतींच्या जमिनी विकण्यासाठी उदयनराजे भाजपात”: नवाब मलिक
2 “भाजपा-महायुतीचा झेंडा पुन्हा विधानसभेवर फडकवून तुमचा आशीर्वाद घ्यायला येईन”
3 मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रा जनतेवर लादली : राजू शेट्टी
Just Now!
X