29 September 2020

News Flash

Coronavirus: पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची १ कोटीची मदत

राज्यातील जनता करोनाच्या संकटातून जात असताना विविध मंदिर समित्या सरकारच्या मदतीला धाऊन आल्या आहेत.

संग्रहित छायाचित्र (सौजन्य- विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती)

राज्यातील जनता करोनाच्या संकटातून जात असताना विविध मंदिर समित्या सरकारच्या मदतीला धाऊन आल्या आहेत. त्यातच आता विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने देखील मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी ही माहिती दिली.

देशातील करोनाचे संकट वाढत आहे. केंद्र आणि राज्य सरकार विविध उपाय योजना करीत आहेत. अशा वेळी राज्यातील काही मंदिर समिती, देवस्थान मादितीसाठी पुढे धावून आले आहेत. मानवतावादी भुमिकेतून व सामाजिक उत्तरदायित्व म्हणून मंदिर समितीने मेडिकल कीट उपलब्ध करून देण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. तर पंढरपूर शहर आणि परिसरातील बेघर व निराधार नागरिकांसाठी अन्नाची पाकीटं उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच राज्य शासनाला आर्थिक मदत करणे ही काळाजी गरज आहे, ही बाब विचारात घेवून पंढरपूरच्या विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीने ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ला १ कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी मंदिर समितीने दुष्काळातही शासनाला मदत केली होती. तर नुकतेच महापुराचे संकट आले होते, त्यावेळेस देखील मंदिर समिती धाऊन गेली होती. दरम्यान, हा निर्णय घेण्यासाठी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी पुढाकार घेतला आहे. तर समितीच्या इतर सदस्यांनी या निर्णयाला सहमती दर्शवली आहे अशी माहिती जोशी यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2020 7:03 pm

Web Title: vitthal rukmini temple committee of pandharpur donates rs 1 crore to cm relief fund backdrop of corona virus aau 85
टॅग Coronavirus
Next Stories
1 महाराष्ट्रातील करोनारुग्णांची संख्या २०० पार, रविवारी २२ जणांची पडली भर
2 वीटभट्टीवर काम करणाऱ्या माता-पित्याची धडपड; मुलांसाठी रात्री २ वाजता सुरु केला पायी प्रवास
3 Coronavirus: मनसेच्या एकमेव आमदाराने मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी, म्हणाले…
Just Now!
X