06 July 2020

News Flash

विवा महाविद्यालाच्या इमारती रुग्ण सेवेसाठी उपलब्ध

वसई-विरार शहरातील हजारो रुग्णांची सोय सहज शक्य होणार

प्रतिकात्मक छायाचित्र

विरारमधील विष्णु वामन ठाकूर धर्मादाय संस्थने विरारमधील विवा महाविद्यालयाच्या दोन इमारतींसह शिरगाव येथील संस्थेच्या महाविद्यालयाच्या इमारतीही वैद्यकीय कारणासाठी विनामूल्य उपलब्ध करून  दिल्या आहेत. यामुळे वसई-विरार शहरातील हजारो रुग्णांची सोय सहज शक्य होणार आहे तसेच बेघरांना अन्नछत्र सुरू करता येणार आहे.

टाळेबंदीच्या काळात महाविद्यालये बंदच आहेत. त्यामुळे विरारमधील दोन आणि शिरगावमधील महाविद्यालयाच्या इमारती रिकाम्या आहेत. या इमारतीमध्ये करोनाग्रस्त रुग्ण, उपचार कऱणारे वैद्यकीय कर्मचारी यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात येऊ शकते. यासाठी ट्रस्टने या तिन्ही इमारती आणि विद्यानगरीचा परिसर विनामूल्य दिला आहे. ट्रस्टचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी शुक्रवारी यासंदर्भातील पत्र पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

जीवदानी देवी मंदिर ट्रस्ट, साईबाबा मंदिर ट्रस्ट, यंग स्टार ट्रस्ट, वि. वा. ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट अशा काही संस्था आणि समाजातील दानशूर लोक यांनी एकत्र येत जवळपास १५ हजार लोकांच्या जेवणाची मोफत सोय केली आहे. महाविद्यालयाच्या इमारतींमध्ये वैद्यकीय सेवा सुरू केल्यास तेथील रुग्णालय कर्मचारी, रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांच्या जेवणा-खाण्याची सोयही विनामूल्य केली जाईल, असंही ठाकूर यांनी या पत्रात म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2020 9:45 pm

Web Title: viva college buildings available for patient care msr 87
Next Stories
1 केवळ तांदूळ, गहू खाऊन पोट कसे भरणार? आदिवासी बांधवांचा सवाल
2 टेन्शन आणखी वाढलं! महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या ४९०
3 Coronavirus : सोशल डिस्टंसिंगच्या आदेशाचे तलासरी तहसीलदारांकडूनच तीनतेरा!
Just Now!
X