मोठी आíथक उलाढाल व मतांचा घोडेबाजार यामुळे चच्रेत आलेल्या जिल्हा सहकारी बँकेचा निवडणूक निकाल उद्या (गुरुवार) जाहीर होणार आहे. संचालक मंडळाच्या १५ जागांसाठी झालेल्या मतदानाची मोजणी कृषी विद्यापीठाच्या जिमखाना हॉलमध्ये सकाळी आठपासून सुरू होईल. दुपापर्यंत निकालाचे कल समोर येऊ लागल्यावर बँक कोणाच्या ताब्यात जाणार, हे स्पष्ट होईल. पणन व प्रक्रिया मतदारसंघात माजी मंत्री सुरेश वरपुडकर विरुद्ध अॅड. रमेशराव दुधाटे यांच्यातील लक्षवेधी लढतीकडे परभणी-िहगोलीतील सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
बँक ताब्यात घेण्यासाठी वरपुडकर-बोर्डीकर विरोधात सुरेश देशमुख यांनी व्यूहरचना आखली. पण िहगोलीतील सोसायटी मतदारसंघात उमेदवार देण्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे आमदार तानाजी मुटकुळे (िहगोली), सुरेश वडगावकर (कळमनुरी), साहेबराव गोरेगावकर (िहगोली), अंबादास भोसले (वसमत) व गयबाराव नाईक (औंढा नागनाथ) बिनविरोध निवडून आले. हे सर्व बिनविरोध संचालक आपलेच असल्याचा दावा वरपुडकर-बोर्डीकर यांनी केला. सुरेश देशमुख परभणीतून बिनविरोध निवडून आले. इतर १५ संचालकांच्या निकालानंतर बँकेचे नवे कारभारी कोण, हेही स्पष्ट होईल. मात्र, रामप्रसाद बोर्डीकर यांना पुन्हा बँकेचे अध्यक्ष होता येणार नाही व अध्यक्ष निवडप्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. त्यामुळे २० संचालकांतच अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड होणार आहे. बोर्डीकरांना यापूर्वीच उच्च न्यायालयाने बँकेच्या कारभारात हस्तक्षेप करण्यास प्रतिबंध केला आहे. बोर्डीकर संचालक म्हणून निवडून आले, तरी त्यांच्यावर उच्च न्यायालयाची टांगती तलवार आहे. येत्या जुलैमध्ये उमेदवारीवर घेतलेल्या आक्षेपाची सुनावणी होणार आहे. काही मतदारसंघांतील निकाल स्पष्ट असले, तरी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती, महिला राखीव व अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातील पाच जागांच्या निकालाकडे जिल्हाभराचे लक्ष आहे.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष बोर्डीकर, तर उपाध्यक्ष सुरेश देशमुख होते. बोर्डीकरांमागे लागलेला न्यायालयीन ससेमिरा यामुळे बँकेची सूत्रे देशमुख यांच्याकडे प्रभारी अध्यक्ष म्हणून आली. बँकेच्या निवडणुकीत अध्यक्ष विरुद्ध प्रभारी अध्यक्ष असेच पॅनेल उभे राहिले.