महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांकडून दिल्या जाणाऱ्या आर्थिक प्रलोभनांमुळे हुरळून न जाता मतदारांना उमदेवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती मिळावी, यासाठी नाशिक पोलिसांनी एक अनोखे पाऊल उचलले आहे. महापालिका निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची ‘कायदा कुंडली’ प्रत्येक पोलीस ठाण्यात मांडली जाणार आहे. यामधून उमेदवारांवरील गुन्ह्यांचा सविस्तर तपशील देण्यात येणार आहे. राज्यात अशा प्रकारचा प्रयोग पहिल्यांदाच होत आहे.

विविध राजकीय पक्षातील किंवा अपक्ष म्हणून निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांवर किती गुन्हे दाखल आहेत, याचा तपशील पोलीस ठाण्यात नागरिकांना दिला जाणार आहे. यासोबतच निवडणूक आयोगाकडून आयोगाच्या संकेतस्थळासह मतदान केंद्रावर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची सचित्र माहिती देण्यात येणार आहे. मात्र त्यापूर्वीच मतदारांसमोर उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर यावी, यासाठी शहर पोलिसांच्या संकल्पनेतून या उपक्रमास प्रारंभ झाला आहे. परिमंडळ दोनसाठी हा उपक्रम मर्यादित असून परिमंडळातील सातपूर, अंबड, इंदिरानगर, नाशिकरोड, उपनगर, देवळाली कॅम्प या पोलीस ठाण्यात उमेदवारांच्या गुन्हेगारी बाजूची माहिती दिली जाणार आहे.

The plight of workers in coalition politics in Raigarh
रायगडात युती आघाड्यांच्या राजकारणात कार्यकर्त्यांची फरपट
Narendra Modi, Kanhan, Nagpur,
‘बेरोजगारी, महागाईबाबत मोदी अपयशी, मात्र राम मंदिर…’, कन्हान येथे पंतप्रधानांच्या सभेला आलेल्या नागरिकांचे मत
Code of Conduct in Thane
ठाण्यात आचारसंहितेचा भंग, मतदारांना योजनांच्या माध्यमातून प्रलोभने देण्याचा उमेदवारांचा प्रयत्न
sharad pawar arvind kejriwal
“केजरीवालांची अटक भाजपासाठी बुमरँग ठरेल”, २०१५, २०२० च्या निवडणुकींचा दाखला देत शरद पवारांचं वक्तव्य

लोकांना त्यांच्या उमेदवारांबद्दल पूर्ण माहिती मिळावी, यासाठी नाशिक पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. राज्यातील अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम आहे. या उपक्रमांतर्गत सध्या सर्व पोलीस ठाण्यात सर्व पक्षातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची प्रभागनिहाय, पक्षनिहाय यादी तयार करण्याचे काम सुरू असून गुरूवार पासुन ही माहिती नागरिकांना खुली होणार असल्याचे परिमंडळ २ चे पोलीस आयुक्त डॉ. श्रीकांत धिवरे यांनी सांगितले.