राज्यभरातील १९ जिल्ह्यांमधील १ हजार ५७० ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २९ मार्च रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतमोजणी ३० मार्च रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यासाठी मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत असणार आहे.

राज्यपालांना सदस्यांधून सरपंच निवडीचा अध्यादेश फेटाळला असल्याने आता थेट सरपंचपदासाठी निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक कार्यक्रम देखील जाहीर झाला आहे. एप्रिल ते जून २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या याचबरोबर नव्याने स्थापित होणाऱ्या ग्रापंचायतींसाठी ही निडणूक होत आहे.

या निवडणुकीसाठीचे उमेदवारी अर्ज ६ ते १३ मार्च या कालावधीत स्वीकरले जाणार आहेत. तर, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख १८ मार्च आहे. शिवाय याच दिवशी निवडणूक चिन्हाचे देखील वाटप होणार आहे.