‘शिवनेरी’सह नाशिकमधील साध्या गाडय़ांना ‘व्हीटीएस’ प्रणाली, आगारात पडद्यावर माहिती

एसटीची वाट पाहत उभे असणाऱ्या प्रवाशांना आता लोकलप्रमाणेच एसटीचीही सद्य:स्थितीही समजणार आहे. शिवनेरीसह साध्या बसगाडय़ांमध्ये व्हीटीएस प्रणाली (व्हेईकल ट्रॅकिंग यंत्रणा) बसवण्यात आली असून ही सुविधा २० किंवा २३ ऑगस्टपासून प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध होईल. त्यामुळे लोकल गाडय़ांप्रमाणेच स्थानक किंवा आगारात बसची वाट पाहत असलेल्या प्रवाशांना एलसीडी स्क्रीनवर एसटीचा ठावठिकाणा समजेल.

Mumbai, BEST, Mumbai BEST buses,
मुंबई : प्रवाशांना थांब्यांवर थांबा, बहुतेक थांब्यांवर प्रवाशांना बेस्ट बससाठी तासन्तास प्रतीक्षा
pune ring road,
पुणे : रिंगरोडमध्ये परदेशी कंपन्यांना रस
Navi Mumbai Municipality Expands Waste Management Scope Introduces waste e Transportation Syste
नवी मुंबई : लवकरच कचऱ्याची ई-वाहतूक सुविधा, कचरा वाहतूक व संकलनासाठी अखेर निविदा प्रसिद्ध
SECR Recruitment 2024 jobs at railway
SECR Recruitment 2024 : रेल्वेमध्ये ‘या’ पदांसाठी मोठ्या संख्येने होणार भरती! अधिक माहिती पाहा

एखादी एसटी स्थानकात किंवा आगारात वेळेवर पोहोचत नाही. त्या गाडीला अनेक कारणांमुळे उशीर होत असतो. एसटीचे वेळापत्रक सुधारावे आणि प्रवाशांना बसची सद्य:स्थिती समजावी यासाठी व्हीटीएस प्रणाली आणण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला होता.

सध्या राज्यातील तीन हजार बसगाडय़ांमध्ये ही प्रणाली बसवण्यात आली असून त्याची चाचणी सुरू होती. यात मुंबई ते पुणे मार्गावरील शिवनेरीसह राज्यातील अन्य साध्या बसगाडय़ांचा समावेश आहे. बसचा ठावठिकाणा एसटीच्या त्या त्या विभागातील नियंत्रकाला कार्यालयात असलेल्या संगणक आणि एलसीडी स्क्रीनवर समजतो का आणि त्यात काही तांत्रिक समस्या तर नाही ना याची प्रथम चाचपणी केली जात होती. त्याच्या यशस्वितेनंतर ही सुविधा प्रवाशांच्या सेवेतही आणण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.

मुंबई ते पुणेसह अन्य काही मार्गावर धावणाऱ्या शिवनेरीच्या ११५ गाडय़ांना, तर नाशिक विभागातील साधारण ८०० पेक्षा जास्त गाडय़ांना व्हीटीएस प्रणाली आहे. प्रथम या प्रवाशांसाठी सुविधा आणली जाणार असून त्यानंतरच राज्यभर अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती एसटी महामंडळातील सूत्रांनी दिली. २० ऑगस्ट किंवा २३ ऑगस्ट रोजी परिवहन मंत्री दिवाकर रावते, एसटी महामंडळ व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांच्या उपस्थितीत या सेवेचे उद्घाटन करण्याची तयारी सुरू आहे.

नव्या प्रणालीचे वैशिष्टय़

  • व्हीटीएस प्रणालीमुळे प्रवासी व एसटी अधिकाऱ्यांना त्याची सद्य:स्थिती समजेल.
  • जीपीएस यंत्रणेद्वारे ती हाताळली जाणार आहे. ही यंत्रणा हाताळण्यासाठी एक स्वतंत्र कक्षही स्थापन केला जाईल.
  • प्रवाशांसाठी आगार आणि स्थानकात स्क्रीन बसवण्यात आले आहेत. त्यावर सुटणाऱ्या व येणाऱ्या बसगाडय़ा कोणत्या, बसला लागणारा वेळ इत्यादी माहिती उपलब्ध होईल.
  • एसटीकडून ही सुविधा मोबाइलवरही देण्यात येणार असून त्यावरही काम केले जात आहे.