गिधाड प्रजात नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. राज्याच्या वनमंत्रालयाने तिवर/कांदळवन संवर्धनासाठी खास उपक्रम आखण्याची गरज निर्माण झाली आहे. गिधाडे जेथे आढळतात तो भागही पर्यावरणदृष्टय़ा संवेदनशील ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. सिंधुदुर्गातही काही भागात गिधाडे दिसत असल्याचे सांगण्यात येते.पृथ्वीच्या निर्मितीपासून सजीवांच्या अनेक जाती निर्माण झाल्या. त्यामुळे पर्यावरणाच्या रक्षणाचा एक भाग आपूसकच पूर्ण होत होता, पण कालांतराने अनेक सजीव प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
गिधाड हा पक्षी उंच झाडावर, कडय़ावर मोठय़ा काठय़ा वापरून घरटी बनवत असे आणि एका वेळी एक अंडे घालून पिल्लू जन्माला घालत असे. अशी शेकडो गिधाडे दाजीपूर येथील गिधाड तळे येथे पाहायला मिळत होती, असे वनप्रेमी सुभाष पुराणिक यांनी बोलताना सांगितले.
दाजीपूर येथील पडसाळी राईत या पक्ष्याची शेकडो घरटी, पिल्ले आपण पाहिल्याचे सुभाष पुराणिक यांनी बोलताना सांगितले. आज रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात मालवण-देवबाग, नाटळ या भागात नारळाच्या झाडांवर पांढऱ्या पाठीची गिधाडे घरटय़ात दिसतात. त्यांचे अस्तित्व महत्त्वाचे आहे. रांगणागड, भैरवगड येथील कडय़ावर लांब चोचीची गिधाडे आढळतात. हे अस्तित्व गिधाडे जोपासत आहेत, पण मानवाने त्यांचे संवर्धन व संरक्षण करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.
डायक्लोफेनॅक हे औषध आज प्रतिबंधित आहे. मेलेली पाळीव गुरे पूर्वी उघडय़ावर टाकली जायची. त्यावेळी गिधाडे त्या ठिकाणी हमखास येत असत. पण सध्या उघडय़ावर मेलेली गुरे टाकण्याचे प्रमाण झपाटय़ाने कमी झालेले आहे. त्यामुळे अन्नाचा तुटवडा गिधाडांना भेडसावत आहे.
जैवविविधतेतील गिधाड ही प्रजात नष्ट होत आहे. त्याचा परिणाम नेमका कशा पद्धतीने होईल हे काळच ठरवेल, पण पर्यावरणीयदृष्टय़ा गिधाड प्रजात वाचायला हवी, असे पर्यावरणप्रेमींना वाटते. त्यामुळे ही प्रजात टिकविण्यासाठी वनमंत्रालयाने खास निर्णय घेण्याची गरज निर्माण झाल्याचे पर्यावरणप्रेमींना वाटते.
या शतकाच्या शेवटी गिधाड जात नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने, शास्त्रज्ञांनी अभ्यास केला असता, पाळीव जनावरांसाठी वापरण्यात येणाऱ्या सर्वसाधारण औषधातील डायक्लोफेनॅक हे रासायनिक द्रव्य त्या प्राण्यांच्या शरीरात राहत असे. मृत प्राणी खाल्ल्यावर ते केमिकल गिधाडांच्या शरीरात जात असे. त्याचा दुष्परिणाम गिधाडांच्या लीव्हर, मूत्रपिंड यावर होऊन हे पक्षी मरून पडत असत. हे सर्वत्रच अचानक घडल्याने चार ते पाच वर्षांत ९७ टक्के गिधाड पक्षी नष्ट झाले. आज रोजी हिमालय पर्वतात संरक्षित क्षेत्रात आणि प्रदूषणमुक्त भागात हे पक्षी कमी संख्येत दिसत आहेत, असे वनप्रेमी सुभाष पुराणिक बोलताना म्हणाले.

upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?
High class houses out of MHADA lottery Thinking of stopping construction of expensive houses from now on
म्हाडा सोडतीतून उच्च गटातील घरे बाद? यापुढे महागड्या घरांची निर्मिती थांबवण्याचा विचार