मंत्रिमंडळ विस्तारानंतरच निर्णय होण्याची शक्यता

Salary of West Vidarbha Higher Education Department employees finally deposited
पश्चिम विदर्भातील उच्च शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अखेर जमा; ‘लोकसत्ता’च्या वृत्तानंतर प्रक्रियेला वेग
Wardha Lok Sabha, Amar Kale,
वर्धा : “कुणी घर देता कां घर…”, अमर काळे यांची शोधाशोध; कार्यालयासाठी…
Kendriya Vidyalaya
केंद्रीय विद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया सुरू, कधीपर्यंत भरता येणार अर्ज?
Director of Rosary School
पुणे : रोझरी स्कूलचा संचालक विनय अरहानासह दोघे अटकेत, मध्यरात्री शिवाजीनगर विशेष न्यायालयात हजर

पालघर जिल्ह्यातील आणि विशेषत: वसई तालुक्यात वाढत असलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नव्याने स्थापन झालेल्या सरकारतर्फे आयुक्तांच्या नेमणुकीचा निर्णय अद्याप प्रतीक्षेत आहे, मात्र नवीन सरकार स्थापन होऊन मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर तसेच जिल्हा परिषद निवडणुकीनंतरच याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे खात्रीलायक सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

मीरा-भाईंदर आणि वसई-विरार परिसर अखत्यारीत नवीन पोलीस आयुक्तालय निर्माण करण्याचा शासन निर्णय होऊन तीन महिन्यांचा कार्यकाळ उलटला असला तरी नवीन आयुक्तालयासाठी पोलीस आयुक्तांची नेमणूक न झाल्याने या क्षेत्रातील सर्व कारभार अजूनही पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयातून सुरू आहेत.

मीरा-भाईंदर आणि वसई-विरार महानगरपालिका हद्दीतील वाढती लोकसंख्या, वाढत्या औद्योगिकीकरणामुळे अस्तित्वात असलेल्या लहान-मोठय़ा उद्योगांमुळे परिसरात कामगारांची संख्या वाढत असल्याने या परिसरात गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी या दोन महानगरपालिका कार्यक्षेत्राकरिता स्वतंत्र आयुक्तालय उभारण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली होती.

पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण यांच्या कार्यक्षेत्रातील मीरा रोड, काशिमीरा, नया नगर, नवघर, भाईंदर आणि उत्तन ही सहा पोलीस ठाणी तसेच पालघर पोलीस अधीक्षक यांच्या कार्यक्षेत्रातील वसई, विरार, नालासोपारा, माणिकपूर, वालीव, अर्नाळा, तुळींज मिळून एकूण १३  ठाणे नियोजित मीरा-भाईंदर व वसई-विरार आयुक्तालयाला वर्ग झाली. त्याचबरोबर या आयुक्तालयाअंतर्गत काशिगाव, खारीगाव, पेल्हार, आचोळे, मांडवी, बोळींज आणि नायगाव ही सात नवीन पोलीस ठाणे निर्माण करण्यास मान्यता दिली.

गुन्हेगारीस आळा

मीरा-भाईंदर व वसई-विरार पोलीस आयुक्तालय सुरू झाल्यानंतर पालघर पोलीस अधीक्षक यांच्या कार्यक्षेत्रात पालघर, बोईसर, जव्हार व डहाणू हे चार उपविभागीय पोलीस कार्यालय तसेच त्याअंतर्गत सोळा (१६) पोलीस ठाणी कार्यरत राहणार आहेत. त्याचप्रमाणे हे नवीन आयुक्तालय हे या भागातील सर्वात मोठे व प्रभावी पोलीस क्षेत्र म्हणून उदयास येण्याची शक्यता आहे.

प्रारंभ भाडय़ाच्या जागेतून

प्रत्यक्षात या नवीन आयुक्तांचे कामकाज सुरू करण्यासाठी पोलीस आयुक्तांची नेमणूक होणे आवश्यक असून १ जानेवारी २०२० पासून हे कार्यालय सुरू होण्यासाठी सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली होती. या आयुक्तालयासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या कोणत्याही कार्यालयीन इमारत, एखाद्या पोलीस ठाण्यातून वा भाडय़ाच्या जागेत सुरू करावे लागणार आहे. त्याचप्रमाणे नवीन आयुक्तालयासाठी जागा निश्चित करणे, प्रस्तावित आयुक्तालयाचा आराखडा तयार करून त्याला मंजुरी मिळणे आणि प्रत्यक्षात बांधकाम करून घेणे या सर्व प्रक्रियेला विलंब लागणार आहे.

१३ सप्टेंबर २०१९च्या गृह विभागाच्या शासन निर्णयानुसार मीरा-भाईंदर आणि वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या निर्मितीस मान्यता. २११७ वर्ग होणारे विविध संवर्गातील पदे ३१७ जिल्ह्याच्या आस्थापनात भरून वर्ग होणारी पदे २४८८ एकूण पदे या आयुक्तालयासाठी वर्ग .