01 December 2020

News Flash

युध्द आता राजकारणाचा भाग वाटू लागलंय – मेधा पाटकर

टाळेबंदीत केंद्राने राज्याला दिलेली वागणूक अत्यंत वाईट

(संग्रहित छायाचित्र)

एकीकडे चीनचे पंतप्रधान भारतात येतात आणि साबरमती आश्रमात झोपाळ्यांवर झुले घेतात. चिनी वस्तुंवर बहिष्कार घालण्याची भाषाही आपण करतो. परंतू, त्यांच्याबरोबर झालेले करार तसेच सुरू ठेवतो. तिसरीकडे त्यांच्या सीमेवर युध्दाची तयारीही करतो. आता युध्द म्हणजे दुर्दैवाने राजकारणाचा भाग झाल्यासारखे वाटते, असे परखड मत ज्येष्ठ पर्यावरणवादी कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केले आहे.

सोलापुरात आज सायंकाळी आल्यानंतर पाटकर यांनी सोलापूर श्रमिक पत्रकार संघात प्रसार माध्यमांशी वार्तालाप केला, यावेळी त्या बोलत होत्या. पाटकर म्हणाल्या, “एकीकडे चीनच्या मुद्यावर आपण राष्ट्रभक्ती दाखविण्याचा प्रयत्न करतो. तर दुसरीकडे त्यांच्यासोबत झालेले करार तसेच ठेवतो हे सर्व परस्पर विसंगत आहे.” दोन राष्ट्रांमध्ये राजकीय, भौगोलिक मुद्यांवर जरूर चर्चा व्हावी, वाटाघाटी व्हाव्यात, परंतू त्यातून आपला देश सुरक्षित राखला जावा. आपले जवानही शहीद होणार नाहीत आणि देशही वाईट परिणाम भोगणार नाही, याची दक्षता घेणे अधिक महत्त्वाचे आहे, असेही त्या यावेळी म्हणाल्या.

टाळेबंदीत केंद्राने राज्याला दिलेली वागणूक अत्यंत वाईट

करोना तथा टाळेबंदीत महाराष्ट्र शासनाबरोबर केंद्रातील मोदी सरकारची वागणूक अतिशय वाईट होती, हे नमूद करताना पाटकर यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. महाराष्ट्राच्या सरकारने केंद्राकडे परप्रांतीय मजुरांना परत पाठविण्यासाठी सुरूवातीला जेव्हा रेल्वेगाड्यांची मागणी केली, तेव्हा त्याला पूर्ण नकार देण्यात आला. त्या सुमारास मुंबई-इंदूर-आग्रा रस्त्यावर लाखो मजूर हजारो किलोमीटर अंतर पायी चालत जात होते. ती अतिशय वाईट अवस्था पाहून आपण स्वतः आत्महत्या करावी काय? असा विचार मनात आला होता, असेही पाटकर यांनी सांगितले. रेल्वेगाड्या पाठविण्यावरून मोदी सरकारने महाराष्ट्र सरकारशी राजकारण खेळल्याचा आरोपही त्यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2020 9:20 pm

Web Title: war is now like a part of politics says medha patkar aau 85
Next Stories
1 अकोल्यात करोना मृत्यूच्या सत्रात १२ व्या दिवशी खंड
2 महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या १ लाख १६ हजार ७५२ वर, दिवसभरात ३७०७ नव्या रुग्णांची नोंद
3 सातारा : वाढदिवशी कोयत्याने कापला केक; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Just Now!
X