News Flash

वर्धा – भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

वर्धा- समुद्रपूर मार्गावर घटना

वर्धा समुद्रपूर मार्गावर आज (रविवार) रात्री पावणे आठ वाजता भरधाव वाहनाने धडक दिल्याने, बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

भरधाव वेगात असणाऱ्या चारचाकी वाहनाने बिबट्याला जोरदार धडक दिल्याने, बिबट्याचा जागीच मृत्यू झाला होता. यानंतर संबंधित वाहनाचा शोध घेणे सुरू असल्याची पोलिसांनी माहिती दिली. या घटनेबाबत अधिक माहिती घेतली जात असल्याचे वन्यजीव रक्षक संजय इंगळे तिगावकर यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.

हा बिबट्या ३ ते ४ वर्षांचा असावा, या परिसरात या अगोदर आढळला नव्हता. पाण्याच्या शोधात भटकंत आला असण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच, रात्र झाल्याने उद्याच त्याचे शवविच्छेदन होईल, त्या नंतरच अधिक माहिती समोर येणार आहे. असे सहाय्यक वन क्षेत्रपाल ठाकूर यांनी सांगितले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2021 8:49 pm

Web Title: wardha a leopard was killed in a road accident msr 87
Next Stories
1 Break The Chain : महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत निर्बंध; अशी आहे नियमावली
2 ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व चंद्रकांत पाटील यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप
3 Lockdown In Maharashtra : सोशल मीडियावर ‘मीम्स’चा पाऊस
Just Now!
X