27 May 2020

News Flash

वर्धा : आरा मशीन केंद्रास आग; लाखोंचे सागवानी लाकूड खाक

जवळपास दोन तास आग धुमसत होती

वर्धा येथील बॅचलर रोडवरील एका आरा मशीन (लाकूड कटाई) केंद्राला आज पहाटे लागलेल्या आगीत लाखो रुपये किंमतीचे सागवानी लाकूड खाक झाले.

जवळपास दोन तास ही आग धुमसत होती.  पहाटे 4 वाजता आग लागल्याचे बोलल्या जाते, आगीची माहिती मिळताच रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जरग यांनी तत्परतेने अग्निशमन दलाला पाचारण केले.  प्रथम वर्धा नगर परिषदेच्या दलाने आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला, नंतर उत्तम पोलाद प्रकल्प, देवळी व हिंगणघाट पालिका तसेच पुलगाव येथून सैन्यदलाची वाहनं आल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

हे लाकूड कटाई केंद्र सेलूच्या साबीर सय्यद यांच्या मालकीचे आहे. या आगीत सागवानी लाकूड, मशीन व अन्य अशी 60 लाखांची मालमत्ता खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शॉर्ट सर्किटने आग लागल्याची शंका व्यक्त होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2020 10:08 am

Web Title: wardha aara machine center got fire teak wood burned msr 87
Next Stories
1 “…असे विकृत ठेचलेच पाहिजेत”, मनसेकडून जितेंद्र आव्हाड प्रकरणावर प्रतिक्रिया
2 VIDEO : देवेंद्र फडणवीस यांची संपूर्ण मुलाखत येथे पाहा
3 CoronaVirus/Lockdown Update: महाराष्ट्रातल्या करोनाग्रस्तांची संख्या १३६४, आत्तापर्यंत ९७ जणांचा मृत्यू
Just Now!
X