26 September 2020

News Flash

Pulgaon Army depot: पुलगावातील सैन्याच्या दारुगोळा भांडारात स्फोट, सहा ठार

Pulgaon Army depot: वर्धा येथील पुलगाव येथे केंद्रीय दारूगोळा भांडार आहे. मंगळवारी सकाळी मुदतबाह्य बॉम्ब निकामी केले जात होते.

Pulgaon Army depot: वर्धा येथील पुलगाव येथे केंद्रीय दारूगोळा भांडार आहे.

Pulgaon Army depot: भारतीय सैन्यासाठी बॉम्ब, हातबॉम्ब, अग्निबाण, दारूगोळा, अद्ययावत शस्त्रास्त्रांचा साठा करणाऱ्या पुलगावातील केंद्रीय दारूगोळा भांडारात जुने बॉम्ब निकामी करताना स्फोट झाला आहे. या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. स्फोटांच्या आवाजामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.

वर्धा येथील पुलगाव येथे केंद्रीय दारूगोळा भांडार आहे. मंगळवारी सकाळी मुदतबाह्य बॉम्ब निकामी केले जात होते. यादरम्यान सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटात ११ जण जखमी झाले आहेत. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून  या घटनेचा तपास सुरु केला आहे.

मंगळवारी सकाळी साडे पाचच्या सुमारास बॉम्ब निकामी करताना पेटी हातातून पडल्यामुळे हा स्फोट झाल्याचे समजते. या स्फोटात ११ जण जखमी झाले. तर सहा जणांचा स्फोटात मृत्यू झाला. जखमींवर सावंगी रुग्णालयात उपचार सुरु असून यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. निकामी बॉम्बचे जस्त कथिल अॅल्युमिनियम वेचण्यासाठी गावातील ग्रामस्थ फायरिंग रेंजमध्ये जातात, असे सांगितले जाते. यासाठी काही शेतमजूर तिथे गेले होते, असे समजते.

सैन्याच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या खमरिया येथील ऑर्डिनन्स फॅक्टरीतील मुदतबाह्य बॉम्ब निकामी करण्यासाठी पुलगाव येथे आणली होती. आज सकाळी बॉम्ब नेत असताना स्फोट झाला. मृतांमध्ये ऑर्डिनन्स फॅक्टरीतील दोन कर्मचाऱ्यांसह, दोन कामगाराचा समावेश आहे.

मृतांची नावे

> नारायण पचारे (वय ५५)

> विलास पचारे (वय ४०)

> प्रभाकर वानखेडे (वय ४०)

> राजकुमार भोते (वय ३३)

> प्रवीण गुंजेवार (वय २५)

> उदय वीरसिंह (वय ३८)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2018 8:59 am

Web Title: wardha bomb disposal two dead pulgaon
Next Stories
1 नाशिक : काँग्रेसचे माजी नगरसेवक सुरेश दलोड यांच्यावर जीवघेणा हल्ला
2 अंजली दमानियांविरुद्धचा एफआयआर रद्द करण्याचे उच्च न्यायालय खंडपीठाचे आदेश
3 मोदी सध्या तुम्हीच सत्तेवर आहात हे कसे विसरता? – उद्धव ठाकरे
Just Now!
X