प्रशांत देशमुख

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षांबाबत संभ्रम असतानाच येथील दत्ता मेघे आर्युविज्ञान अभिमत विद्यापीठाने काही अटींसह सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रवेश देत ऑनलाइन शिक्षण सुरू केले आहे.

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”
Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
UPSC Result, UPSC Result Marathi News, UPSC Civil Services Final Result 2023 Out
यूपीएससी परीक्षेत विदर्भाचा डंका, नागपूरच्या पाच विद्यार्थ्यांनी मारली बाजी
Ragging on two postgraduate students at BJ Medical College in Pune print news
धक्कादायक! पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तरच्या दोन विद्यार्थिनींवर ‘रॅगिंग’

करोनाच्या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षण विभागाने सर्व अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पुढील वर्षासाठी पात्र ठरविले. याविषयी तर्कवितर्क व्यक्त होत असतानाच वैद्यकीय शिक्षणाबाबत नेमका निर्णय न आल्याने या शाखेतील विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूंनी लवकरच याबाबत निर्णय होण्याची खात्री दिली.

अशी संदिग्धता असल्याने मेघे अभिमत विद्यापिठाने २०२०-२१ चे शैक्षणिक सत्र १ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. एमबीबीएस वगळून दंत, आयुर्वेद, फिजिओथेरिपी, नर्सिग या शाखेतील विद्यार्थ्यांना पुढील वर्षासाठी प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. मात्र, नियोजित परीक्षेला या सर्व विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागेल. त्यात अनुत्तीर्ण झाल्यास आधीच्याच वर्षाचा विद्यार्थी म्हणून त्याची नोंद राहील. दरम्यान, पुढील वर्षाचा प्रवेश पक्का करून या विद्यार्थ्यांना नव्या वर्षाचे शिक्षण देणे सुरू झाले आहे.

दंत शाखेतील विद्यार्थ्यांना प्रथम ते चतुर्थ वर्षापर्यत पुढील प्रवेश मिळाला आहे. १ जूनपासून ऑनलाईन शिक्षण सुरू होणार असल्याचे कुलगुरू डॉ. राजीव बोरले यांनी नमूद केले. फार्मसी व फिजिओथेरपी अभ्यासक्रामाचे शिक्षण १ जुलैपासून सुरू होणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आपापल्या गावी गेले आहेत. परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतरच ते परततील. आल्यानंतर त्यांच्या विलगीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करण्याबाबत घाई होवू नये म्हणून ऑनलाईन शिक्षणाची भूमिका विद्यापीठ प्रशासनाने घेतली आहे.