अवकाळी पावसाने वर्धा मधील  सिंदी रेल्वे  महसुल मंडळातील आठ  गावातील घरांचे  मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.  या गावातील झालेल्या घरांच्या नुकसानीची पाहणी आज  राज्याचे  पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय  विकास, क्रिडा व युवक कल्याण तथा जिल्ह्याचे  पालकमंत्री सुनिल केदार यांनी केली.

पालकमंत्री केदार यांनी  चानकी, कोपरा व पिंपळगाव येथील नुकसान झालेल्या घरांची पाहणी केली.   सेलू तालुक्यात  14 मे रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे  सिंदी रेल्वे महसूल  मंडळातील  झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असून प्राथमिक अंदाजानुसार  चानकी -158, कोपरा-110, हिवरा-20, पिंपळगाव-20, वघाळा-20, टाकळी -6  देऊळगाव-3, दिंदोडा-7 या आठ गावातील  344 घरांचे अंशत: नुकसान झाले असून घराची पत्रे उडाली आहेत. चानकी व कोपरा गावातील नुकसान झालेल्या घरात  असलेले धान्य तसेच कापूस ओला झाला. चानकी, कोपरा  व पिंपळगाव येथील  जनावरे जखमी झाले.