News Flash

वर्धा : लॉकडाउनमुळे ठप्प झालेल्या ग्रामपंचायतींच्या मासिक सभा होणार पूर्ववत

सभेला उपस्थित सर्वांना मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अ‍ॅप बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे.

संग्रहित छायाचित्र

लॉकडाउनमुळे वर्धा जिल्ह्यातील ग्रामपंचायतच्या ठप्प पडलेल्या मासिक सभा पूर्ववत सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने शुक्रवारी घेतला. काही अटी आणि शर्थींसह हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात पाठपुरावा केला होता.

कायद्यानुसार ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची महिन्याला एक सभा होत असते. त्यात विविध निर्णय घेतले जातात. मात्र, मार्चमध्ये लॉकडाऊन झाल्याने सलग दोन सभा झाल्या नाही. आता अशी मासिक सभा घेण्याची परवानगी जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी काही अटींवर आज दिली.

सभेसाठी घालून दिलेले नियम व अटी 

त्यानुसार, सभेमध्ये ग्रामपंचायत सदस्यांसह इतर चार व्यक्ती उपस्थित राहू शकतील. उपस्थित चर्चेच्या तिप्पट क्षमतेच्या उपस्थितीचे सभागृह असावे. सभेचे व्हिडीओ चित्रिकरण करावे. प्रत्येकाने स्वतंत्र पेन व पाण्याची बॉटल बाळगावी. सभेत चहा नाश्ता घेवू नये. सभागृहाच्या प्रवेशदारावर स्वच्छतेच्या सोयी असाव्या. फिजिकल डिस्टंसिंगचे पालन करताना प्रत्येकाने मास्क वापरावा. सभेला उपस्थित सर्वांनी त्यांच्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अ‍ॅप बाळगणे आवश्यक आहे. उपस्थित व्यक्ती किंवा त्याच्या कुटूंबातील अन्य सदस्यास गृह विलगीकरणात ठेवण्यात आले असल्यास अशांनी सभेत हजेरी टाळावी. तापाची लक्षणे असलेल्या व्यक्तीला सभेत प्रवेश देवू नये, अशा अटींचा यात समावेश आहे.

मे महिन्यात निघालेल्या या आदेशामुळे सभा शक्य आहे का? अशी विचारणा केल्यावर जिल्हा परिषदेचे उपमुख्याधिकारी विपुल जाधव म्हणाले, अद्याप आठ दिवस असल्याने मे महिन्याची सभा घेणे शक्य होवू शकते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2020 8:22 pm

Web Title: wardha monthly meetings of gram panchayat which were disrupted due to lockdown will be resumed aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 महाराष्ट्रात नवे २९४० करोना रुग्ण, ६३ मृत्यू, संख्येने ओलांडला ४४ हजारांचा टप्पा
2 …मग पंतप्रधान तरी कुठं पीपीई किट घालून फिरतायत; हसन मुश्रिफांचा भाजपावर पलटवार
3 …तर महाराष्ट्रानं भाजपाची पाठ थोपटली असती; भाजपाच्या आंदोलनावर संजय राऊत संतापले
Just Now!
X