News Flash

वर्धा – शंभर बेडचे कोविड हॉस्पिटल खासगी तत्वावर मंजूर

मेघे विद्यापिठाने प्रस्ताव सादर केल्यानंतर त्यास मान्यता मिळाली आहे.

दत्ता मेघे आर्युविज्ञान अभिमत विद्यापिठाच्या महात्मा गांधी आर्युवेद महाविद्यालयाच्या रूग्णालयात शंभर बेड्सचे करोना रूग्णालय खासगी तत्वावर मंजूर करण्यात आले आहे.

वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी आज(गुरूवार) या रूग्णालयास मान्यता दिली. पूर्णत: खासगी तत्वावर मान्यता देण्यात येत असून शासकीय आरोग्य यंत्रणेकडून शिफारस झालेल्या रूग्णांनाच दाखल करून घेणे संस्थेस बंधनकारक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

सध्या सावंगी तसेच सेवाग्रामच्या समर्पित रूग्णालयात एक हजार बेड करोना बाधितांसाठी उपलब्ध आहेत. मात्र वाढत्या संक्रमणामूळे ही व्यवस्था अपूरी ठरल्याने पर्यायी व्यवस्था आवश्यक ठरली होती. मेघे विद्यापिठाने या अनुषंगाने प्रस्ताव सादर केल्यावर आज त्यास मान्यता देण्यात आली. अतीगंभीर नसूनही ज्यांना भरती होण्याची गरज भासत असेल, अशा बाधित रूग्णांना या ठिकाणी भरती करण्याची व्यवस्था येथे करण्यात आली आहे. ज्या रूग्णाकडे गृह विलगीकरणाची व्यवस्था नाही, अशांची काळजी येथील करोना दक्षता विभागात घेतल्या जाणार आहे. रूग्णालयातील वास्तव्य कालावधीत रूग्णांना चहा, नाष्टा, सकस आहार, औषधोपचार, वैद्यकीय समुपदेशन, आर्युवेद तज्ज्ञांचे मार्गदर्शन, ध्यानधारणा, योगा, आर्युवेदिक काढा, अशा उपयुक्त सुविधा मिळणार असल्याचे जनसंपर्क अधिकारी संजय इंगळे तिगावकर यांनी सांगितले आहे.

रूग्णालयाचे उद्घाटन संस्थेचे विश्वस्त सागर मेघे यांच्या हस्ते शुक्रवारी २३ एप्रिलला होत आहे. सदर आर्युवेद रूग्णालय हे राष्ट्रीय रूग्णालय मानांकन मंडळाद्वारे मानांकित झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2021 7:46 pm

Web Title: wardha one hundred bed covid hospital sanctioned on private basis msr 87
Next Stories
1 मृत रूग्णाच्या खिशातील ४५ हजार रुपये चोरल्याचा नातेवाईकांचा वॉर्ड बॉयवर आरोप
2 वर्धा : रूग्णांना ‘बेड’ मिळत नसल्याने टास्क फोर्सच्या बैठकीत झाला ‘हा’ महत्वाचा निर्णय
3 पंकजा मुंडेंच्या जवळच्या व्यक्तीचं करोनामुळे निधन; फेसबुकवरुन दिली माहिती
Just Now!
X