28 October 2020

News Flash

वर्धा : बल्लरशाहकडे  निघालेल्या मालगाडीचे डब्बे घसरले

रेल्वेगाडयांचे आवागमन बंद असल्याने मोठा अनर्थ टळला

दक्षिणकडे जात असलेल्या एका मालगाडीचे दोन डब्बे रविवारी सायंकाळी 6 वाजता रूळावरून उतरले. रेल्वेगाडयांचे आवागमन बंद असल्याने मोठा अनर्थ टळला. रेल्वे विभागाने युध्दस्तरावर दुरस्तीचे काम सुरू केले आहे. रात्री वृत्त लिहेस्तोवर काम सुरूच होते.

लॉकडाउनमुळे रेल्वे विभागाच्यावतीने मालगाडयांमधून मोठ्याप्रमाणावर साहित्याची ने आण करण्यात येत आहे. रविवारी सायंकाळी आठ डब्ब्याची मालगाडी वर्धा रेल्वेस्थानकावरून निघाली. बजाज चौकातील ओव्हर ब्रीज पार करताच रेल्वेच्या पाच व सहा नंबरच्या  094415 व 0933313 क्रमांकाचे दोन डब्बे रूळावरून घसरले. 5 नंबरच्या डब्ब्याचे एक चाक व एक स्प्रिंग तुटल्याने हा आपघात झाल्याची माहिती आहे. ही ट्रेन बल्लरशाहकडे  चालेली ही ट्रेन संथ गतीने निघाली होती. कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ मोठे वळण असल्याने गती आणखी कमी करण्यात आली. यामुळे मोठा अपघात टळला. ही मालगाडी चवथ्या लाईनने जात असल्याने अप-डाऊन यामुख्य लाईनवर कोणताही प्रभाव पडला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2020 8:12 pm

Web Title: wardha the coaches of a goods train heading towards ballarshah fell down msr 87
Next Stories
1 आज काय बोलणार उद्धव ठाकरे? राज्यातील जनतेचे मुख्यमंत्र्यांच्या भाषणाकडे लक्ष
2 Coronavirus : राज्यभरात ‘अर्सेनिक अल्बम-३०’ औषध मोफत पुरवणार : हसन मुश्रीफ
3 “महामार्गाच्या कामामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास, प्राधिकरणाकडून नुकसानभरपाई वसूल करणार”
Just Now!
X