News Flash

वर्धा : मेघे अभिमत विद्यापिठाचा यंदाचा गणेशोत्सव कोविड योद्ध्यांना समर्पित

उपक्रमासाठी राखून ठेवलेला संपूर्ण निधी आरोग्य सुविधांवर खर्च केला जाणार

सावंगी येथील मेघे अभिमत विद्यापिठाचा गणेशोत्सव यावर्षी कोविड  योद्ध्यांना समर्पित करण्यात आला असून, उत्सवाचा खर्च आरोग्य सुविधांवर केला जाणार आहे.

ज्ञान व रंजनपर उपक्रमांसाठी विदर्भात सावंगीचा गणेशोस्तोव ओळखला जातो. मात्र कोविड‑१९ च्या पार्श्वभूमीव हा उत्सव या वर्षी साधेपणाने करण्याचा निर्णय झाला असून, उपक्रमासाठी राखून ठेवलेला संपूर्ण निधी आरोग्याच्या सुविधा वाढविण्यासाठी खर्च केल्या जाईल, असा मानस विद्यापिठाचे कुलपती व श्रीमती  राधिकाबाई मेघे ट्रस्टचे अध्यक्ष दत्ता मेघे यांनी व्यक्त केला.

या वर्षीची गणेश मुर्ती संस्थेतील कलावंतच सुनील येनकर यांनी साकारली आहे. करोना विरूध्द लढणाऱ्या गणरायाच्या मागे डॉक्टर, पोलीस अणि स्वच्छता कर्मचारी यांचेही शिल्प साकारण्यात आले आहे. त्यामुळे गणेश भक्तांना यावेळी करोना योद्ध्यांचे स्मरण ठेवून गणेश दर्शन घडणार आहे. गर्दी टाळण्यासाठी सर्व मोफत आरोग्य शिबिरे व विज्ञान प्रदर्शनी रद्द करण्यात आल्या आहेत. केवळ जलजन्य व साथींच्या आजारांबाबत विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांचे सांस्कृतीक कार्यक्रम, अतिथी कलाकारांचे सादरीकरण, विदर्भस्तरीय स्वरवैदर्भी स्पर्धा व अन्य उपक्रमामुळे या उत्सवाची ओढ नागरिकांना लागली असते. मात्र यावर्षी ते होणार नसल्याने सर्वाचा हिरमोड झाला आहे. करोनाच्या संकटावर लवकरच आपण मात करू, असा विश्वाास दत्ता मेघे यांनी व्यक्त केला. गणेशोस्तोवास भेट देणाऱ्या नागरिकांनी विद्यापीठ व रूग्णालय प्रशासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करीत आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन कुलगुरू डॉ. राजीव बोरले यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2020 6:41 pm

Web Title: wardha this years ganeshotsav of meghe abhimat university is dedicated to covid warriors msr 87
Next Stories
1 सातारा : पोलीस मुख्यालयासह २९ ठाण्यातील पोलिसांना करोनाची लागण
2 राज्यात २४ तासांत आणखी २८८ पोलीस करोनाबाधित, दोघांचा मृत्यू
3 Loksatta.Com वर असा अपलोड करा तुमच्या घरच्या बाप्पाचा फोटो
Just Now!
X