News Flash

वर्धा : विजेच्या धक्क्याने दोन बालकांचा मृत्यू

समुद्रपूर तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या घटना

प्रतिकात्मक फोटो

वर्धा येथील समुद्रपूर तालुक्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन बालकांचा विद्युत प्रवाहाचा धक्का बसल्याने मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडल्याचे समोर आले आहे.

तालुक्यातील मांगली या गावातील अमोल उईके यांचा नऊ वर्षीय मुलगा बुधवारी आकाश गावातील मंदिरात खेळत होता. सायंकाळी पाच वाजता खेळून बाहेर निघत असतांना, त्याचा एका आर्थिंगच्या तारेस स्पर्श झाल्याने तो जागेवरच पडला. ही बाब लक्षात आल्यावर त्याला ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

तर, दुसऱ्या एका घटनेत प्रशांत भोयर यांची मुलं हर्षल व गणेश घरात खेळत होते. दरम्यान प्रशात हे स्नान करण्यास गेलेले असताना व त्यांची पत्नी स्वयंपाकात असतांना त्यांना गणेशच्या ओरडण्याचा आवाज आला. यावर दोघेही पती-पत्नी धावत आले असता त्यांना हर्षल (६ वर्षे) हा कुलरला चिकटून पडल्याचे त्यांना दिसले. कुलरच्या टपात ठेवलेली लोणच्याची बरणी काढत असतांना त्याला विजेचा धक्का लागल्याचे समोर आले. यावर त्याला तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाला. पोलिसांकडे या घटनेची नोंद झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2020 6:46 pm

Web Title: wardha two children die due to electric shock msr 87
Next Stories
1 यवतमाळमध्ये करोनाबाधितांची संख्या दीडशेपार; ४२ रूग्णांवर उपचार सुरू
2 पालघर : ग्रामीण भागातील पाचशेहून अधिक करोना रुग्णांसाठी सुविधा तयार
3 परदेशातील ४ हजार भारतीय महाराष्ट्रात दाखल; १३०९ नागरिक मुंबईतील
Just Now!
X