News Flash

बनावट पदवी घोटाळ्यात वर्धा येथील कुलगुरूंवर ठपका

दहा आरोपी कर्मचाऱ्यांविरुद्ध विद्यापीठ पातळीवर कारवाई होणार असल्याचे शिक्षण खात्याने स्पष्ट केले.

प्रशांत देशमुख

उत्तर प्रदेशातील बनावट पदवी घोटाळयात येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रजनीश शुक्ल यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारसही करण्यात आली आहे.

कुलगुरू शुक्ल हे उत्तर प्रदेशातील संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठाचे कुलसचिव असतांना हा प्रकार घडल्याने त्यांच्यावर हा ठपका ठेवण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या बेसिक शिक्षा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांची भरती करण्यात आली होती. त्यात संस्कृत विद्यापीठाची बनावट पदवी दाखवून अनेकांनी शिक्षकांची नोकरी मिळवल्याचा आरोप झाला होता. या आरोपामुळे राज्य शासनाने विशेष तपास चमू गठीत केली. या चमूने २००४ ते २०१४ दरम्यान निवड झालेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी केली. त्यात बनावटपणा दिसून आला. तपासणी अहवालात कुलसचिव व परीक्षा नियंत्रक यांच्यासह १९ कर्मचारी यांच्यावर लबाडी केल्याचा ठपका ठेवण्यात आला. विषेश चमूच्या अहवालासोबतच उत्तर प्रदेशच्या शिक्षण खात्याने या सर्व व्यक्तींवर कर्तव्याचे पालन न केल्याचाही ठपका ठेवला. अनुचित लाभ व व्यक्तिगत हितासाठी पदव्या प्रमाणित करण्यात आल्या. सोबतच परीक्षा विभागाच्या दस्तऐवजात हेराफेरी करण्यात आल्याचेही या अहवालात नमुद आहे. त्यामुळे दहा आरोपी कर्मचाऱ्यांविरुद्ध विद्यापीठ पातळीवर कारवाई होणार असल्याचे शिक्षण खात्याने स्पष्ट केले.

या घोटाळयात कुलगुरू शुक्ल यांच्यासोबतच झारखंडच्या कोल्हान विद्यापिठाचे कुलगुरू प्रा.गंगाधर पंडा यांच्यावरही ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच संस्कृत विद्यापिठाचे माजी कुलसचिव विद्याधर त्रिपाठी, योगेंद्रनाथ गुप्ता, रमेशकुमार द्विवेदी, आय. पी. झा. सच्चिदानंद सिंह, महेंद्रकुमार व दिप्ती मिश्रासुद्धा आरोपाच्या घेऱ्यात आहेत. शिवाय अधीक्षक कौशलकुमार वर्मा, कृपाशंकर पांडे, भगवतीप्रसाद शुक्ला, विजयशंकर शुक्ला, मिहीर मिश्रा, हरी उपाध्याय, शशींद्र मिश्र, त्रीभूवन मिश्र, विजयमणी त्रिपाठी व मोहीत मिश्रा या कर्मचाऱ्यांवरही आरोप आहेत.

सध्या हे प्रकरण समजून घेत आहे. २००४ ते २०१४ दरम्यानच्या सर्वच कुलसचिवांवर आरोप आहेत. विशेष म्हणजे, या प्रकरणात मीच तक्रार केली होती.  या आरोपांबाबत  योग्य त्या ठिकाणी खुलासा करणार आहे. सध्या काही सविस्तर सांगता येणार नाही.

– प्रा. रजनीश शुक्ल, कुलगुरू.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2021 12:31 am

Web Title: wardha vice chancellor reprimanded in fake degree scam abn 97
Next Stories
1 ताडोबात मास्क शिवाय प्रवेश करणाऱ्या पर्यटकास १ हजार रुपये दंड
2 डेस्टिनेशन वेडिंगसाठी जयपूरला गेलेल्या १८० वऱ्हाडींना करोना चाचणी करण्याचे आदेश
3 Corona Update : चिंताजनक! राज्यात दिवसभरात ८८ रुग्णांचा मृत्यू, तर १५ हजार ६०२ नवे करोनाबाधित!
Just Now!
X