ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम)चे प्रवक्ते आणि भायखळाचे माजी आमदार वारिस पठाण यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यावरून माफी मागण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. मी जे काही म्हटलेय ते संविधानाच्या मर्यादेतच राहून बोललो असल्याचं स्पष्टीकरण वारिस पठाण यांनी दिलं आहे. “१५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी आहोत, लक्षात ठेवा ही गोष्ट “असं धार्मिक तेढ निर्माण वादग्रस्त वक्तव्य वारिस पठाण यांनी १५ फेब्रुवारी रोजी एका जाहीर कार्यक्रमात केलं होतं. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. विशेष म्हणजे यावेळी मंचावर एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांची देखील उपस्थिती होती.

वारिस पठाण यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीकेचे झोड उडत आहे. वारिस पठाण यांनी मात्र माफी मागण्यास नकार दिला असून भाजपाला लक्ष केलं आहे. प्रसार माध्यमांशी बोलतना वारिस पठाण म्हणाले की, ‘मी संविधानाच्या मर्यादेत राहूनच बोललो आहे, त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच नाही, जे लोक विरोध करत आहेत ते कायद्याच्या विरोधात आहेत. भाजपा आम्हाला १३० कोटी लोकांपासून वेगळं करण्याच्या घाट घालत आहे.’

Why Are the Rajput community angry at the statement of Union Minister Rupala
गुजरातमध्ये भाजपच्याच नेत्यामुळे भाजप अडचणीत? केंद्रीय मंत्री रुपाला यांच्या विधानावर रजपूत समाज संतप्त का?
vijay shivtare
निनावी पत्राद्वारे शिवतारेंच्या माघारीवर टीका; पवारांच्या विरोधातील ५ लाख ८० हजार मतदारांनी करायचे काय?
Parakala Prabhakar
केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या पतीची निवडणूक रोख्यांवर टीका; आता भाजप विरुद्ध भारतीय जनता अशी लढाई – पी.प्रभाकर
Nitin Gadkaris development speed is limited in his second term as MP compared to the first five years
पहिल्या पाच वर्षाच्या तुलनेत दुसऱ्यांदा खासदारकी भूषविताना गडकरींच्या विकास गतीला मर्यादा

वारिस पठाण यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात पुणे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजपा आणि मनसेनं वारिस पठाण यांच्या टीका केली आहे.

आणखी वाचा – लक्षात ठेवा! १५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी आहोत; ‘एमआयएम’च्या नेत्याचे बेताल वक्तव्य

काय म्हणाले होते वारिस पठाण?
सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय लोकसंख्या सूचीविरोधात आंदोलने सुरू आहेत. पठाण यांनी गुलबर्गा येथील सभेत बोलताना, ‘आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचे असून ते मागून मिळत नसते, तर हिसकावून घ्यायचे असते. आता फक्त वाघिणी (मुस्लीम महिला) पुढे आल्या, तर तुम्हाला घाम फुटला. आपणही सोबत आलो, तर काय होईल? आपण १५ कोटी असून १०० कोटींना भारी पडू, असे चिथावणीखोर वक्तव्य पठाण यांनी केले होते.

आणखी वाचा – राज ठाकरे यांनी दिलेला इशारा खरा ठरला आहे – शालिनी ठाकरे

मनसेचा वारिस पठाण यांच्यावर निशाना –
मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी यासंदर्भात फेसबुक पोस्ट केली आहे. “ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीनचे नेते आणि महाराष्ट्र विधानसभेचे माजी आमदार वारिस पठाण यांनी एक अत्यंत आक्षेपार्ह विधान केलेलं आहे. त्यांच्या वक्तव्यात मग्रुरी आहे. माज आहे. वारिस पठाण देशातील मुसलमानांना उद्देशून म्हणतात, आपण “१५ कोटी आहोत, पण १०० ला भारी आहोत, लक्षात ठेवा ही गोष्ट!” ‘१००ला भारी’ म्हणजे नेमके कोणाला हे १५ भारी पडणार? हिंदूंनाच ना! हिंदुस्थानात राहून हिंदूंनाच धमकी देतोय हा उपटसुंभ!

आणखी वाचा – देशातील १५ कोटी मुस्लिमांचा ठेका तुम्हाला कोणी दिला?

जावेद अख्तर यांचा वारिस पठाण यांच्यावर हल्लाबोल
या देशात ब्रिटिशांनी १५० वर्ष सत्ता केली.पण देशातील ऐक्याला त्यामुळे फरक पडला नाही. मुस्लीम बांधव देशात एकतेच्या भावनेने सामावले गेले आहेत. असे असताना या १५ कोटी मुस्लिमांचा ठेका घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?असा जाब जावेद अख्तर यांनी उपस्थित केला. तसेच, तुम्ही पंधरा कोटीच रहाल, कधी सोळा कोटी होणार नाही, असे म्हणत अख्तर यांनी वारिस पठाण हे वेडे आहेत. आजही जिनांच्या विचारसरणीत ते वावरत आहेत, असा टोल लगावला.

भाजपाने लगावला टोला –
जे पठाण पाच लाखाहून कमी मतदार असलेल्या विधानसभा मतदारसंघातून निवडून येऊ शकत नाहीत, त्यांनी स्वतला १५ कोटी नागरिकांचे प्रतिनिधी समजून बोलण्याची गरज नाही, असा टोला भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी लगावला.