News Flash

“तृप्ती देसाई शिर्डीत येऊ दे, त्यांचे सगळे स्टंट बंद करतो”

ड्रेसकोडच्या मुद्द्यावरून शिवसेना पदाधिकाऱ्याचा इशारा

शिर्डी देवस्थानकडून दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या ड्रेसकोडसंबंधी एक फलक लावण्यात आला होता. या निर्णयाच्या फलकाविरोधात भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आक्रमक झाल्या. काही दिवसांपूर्वी त्यांनी देवस्थानच्या पुजाऱ्यांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं. त्यानंतर आज तृप्ती देसाई पुण्याहून शिर्डीला जाणार असून साई संस्थानाने लावलेला आवाहनाचा फलक काढण्याच्याबाबत आंदोलन करणार आहे. या फलकावरून वातावरण तापलेले असतानाच शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी तृप्ती देसाई यांना इशारा दिला आहे.

“तुम्ही हेलिकॉप्टरमध्ये बसा, मागे अजिबात पाहू नका”; वाचा अमोल कोल्हेंबद्दलचा मजेशीर किस्सा

“शिर्डी येथील मंदिर आवारामधील महिलांच्या वेशभूषेबाबत जो बोर्ड लावण्यात आला आहे, त्याच्या निषेधार्थ आज आम्ही तिथे जाऊन लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत. तो बोर्ड लवकरात लवकर लवकर हटवला जावा, अन्यथा आम्ही आणखी तीव्र लढा उभारू”, असा इशारा देत तृप्ती देसाई पुण्याहून शिर्डीच्या दिशेने रवाना झाल्या. तृप्ती देसाई शिर्डीत येणार असल्याने ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्तेही तिथे पोहोचले आहेत. सीमेवरच त्यांना रोखू असा इशारा त्यांनी दिला आहे.

पुण्यातल्या रानगव्यावरुन ट्रोल झाल्यानंतर चंद्रकांत पाटील म्हणतात…

या साऱ्या प्रकारात शिवसेनेच्या महिला संघटक स्वाती परदेसी यांनी तृप्ती देसाई यांना एक इशारा दिला आहे. “तृप्ती देसाई शिर्डीत यायलाच हव्या. त्यांना इथे आल्यावर कळेल की त्यांनी संस्थानावर केलेले आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत. त्या इथे आल्या की त्यांच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय आम्ही नक्कीच राहणार नाही. तसंच, दरवेळी मंदिरात जे काही स्टंट त्या करत असतात, त्यांचे ते सगळे स्टंट आम्ही आज बंद करू”, असा इशारा परदेसी यांनी दिला.

काय आहे ड्रेसकोड फलक प्रकरण

शिर्डीमधील साई मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं असून भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी शिर्डी साई संस्थानकडून ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. मंदिरात येताना भक्तांनी सभ्य पोषाख परिधान करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून भक्त छोटे कपडे घालून मंदिरात येत असल्याची तक्रार आहे त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं संस्थानकडून सांगण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2020 12:24 pm

Web Title: warning to trupti desai over shirdi sai baba sansthan by shivsena leader to breakdown all stunts vjb 91
Next Stories
1 “चीन आणि पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक करा,” संजय राऊतांची मोदी सरकारकडे मागणी
2 केवळ मंदिरे उघडण्यास परवानगी; यात्रा, जत्रा ,उत्सव, उरुसास जिल्हाधिकाऱ्यांचा नकार
3 शेतकरी आंदोलनाचा चीन-पाकिस्तानशी संबंध जोडणाऱ्या दानवेंवर संजय राऊत संतापले, म्हणाले…
Just Now!
X