काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात सोलापूर न्यायालयाकडून वॉरंट जारी करण्यात आलं आहे. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी न्यायालयात दाखल खटल्याच्या सुनावणीला हजर न राहिल्याबद्दल प्रणिती शिंदे यांच्याविरोधात जामिनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. जिल्हा नियोजन बैठकीदरम्यान पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना घेराव घालण्याचा प्रयत्न करताना झालेल्या धक्काबुक्कीत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला होता. याप्रकरणी न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. सुनावणीदरम्यान प्रणिती शिंदे गैरहजर राहिल्याने जामिनपात्र वॉरंट बजावण्यात आलं आहे. प्रणिती शिंदे यांच्यासहित महापालिका गटनेते चेतन नरोटे यांना ३ सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे.

दरम्यान याप्रकरणी न्यायालयात हजर झालेल्यांना न्यायालयाने दोन दिवसांसाठी अंतरिम जामीन वाढवून दिला आहे. यामध्ये माजी आमदार प्रकाश यलगुलवार, शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्यासहित साज जणांचा समावेश आहे.

kejriwal arrest
न्यायालयांचा केजरीवाल यांना पुन्हा धक्का; तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार ?
prashant bhushan
चार हजार कोटींच्या निवडणूक रोख्यांचा हिशेब नाही! प्रशांत भूषण यांचा दावा; एसआयटी चौकशीसाठी लवकरच याचिका
arvind kejriwal
‘आप’चे अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न; केजरीवाल यांच्या सुटकेच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान वकिलाचा दावा
Damania plea
दोषमुक्तीविरोधात दमानिया यांच्या याचिकेची उच्च न्यायालयाकडून दखल, भुजबळ कुटुंबीयांना नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

२ जानेवारी २०१८ रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली होती. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं होतं. औषधोपचारावर झालेली दरवाढ रद्द करा अशी मुख्य मागणी आंदोलकांची होती. कार्यकर्ते पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या गाडीला घेराव घालण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत पोलीस कर्मचारी खाली पडून जखमी झाला होता. यानंतर पोलिसांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्यासहित इतरांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकऱणी गुन्हा दाखल केला होता.

पोलिसांनी तपास करत चार्जशीटही दाखल केली होती. दरम्यान खटल्याच्या सुनावणीसाठी प्रणिती शिंदे आणि चेतन नरोटे गैरहजर राहिल्याने त्यांच्याविरोधात जामिनपात्र वॉरंट काढण्यात आलं आहे.