News Flash

मराठवाडयासाठी धरणातून पाणी सोडलं, नाशिकमध्ये गाडया गेल्या वाहून

मराठवाडयातील जायकवाडी धरणात नगर आणि नाशिक जिल्ह्याच्या धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. यामुळे नाशिकमधील गोदावरी नदीत पूरस्थिती निर्माण झालीय.

मराठवाडयातील जायकवाडी धरणात नगर आणि नाशिक जिल्ह्याच्या धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. यामुळे नाशिकमधील गोदावरी नदीत पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक गाडया वाहून गेल्याचे वृत्त आहे. यंदा मराठवाडयात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.

जिल्ह्यातील अनेक धरणांमध्ये पुरेसा पाणी साठा नाहीय. त्यामुळे समन्यायी पाणी वाटप धोपणानुसार नगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून मराठवाडयातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आले आहे. दारणा, गंगापूर, निळवंडे, मुळा, मुकणे धरणांतून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आले आहे.

निळवंडे धरणातून ६००० क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. गंगापूर धरणातून २ ११२, निळवंडे धरणातून ४२५०, मुळा धरणातून ६ हजार तर मुकणे धरणातून १ हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2018 6:16 pm

Web Title: water from nashik dam to marathwada jaykwadi dam cars drown
Next Stories
1 दुष्काळ निर्मूलनासाठी नवे सूत्र
2 पूर्ववैमनस्यातून शिवसेना नगरसेवकावर चाकूहल्ला
3 राज्यातील सात जिल्ह्य़ांत ५९ मिनिटांत ‘कर्जधमाका’!
Just Now!
X