कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची दिवसाची ओढ तर रात्रीचा जोर कायम आहे. धरणाचे ६ वक्र दरवाजे सलग पाचव्या दिवशीही दीड फुटांवर असून, कोयना नदीपात्रात दरवाजातून १४,०१० तर, पायथा वीजगृहातून २,१११ असे एकूण १६,१२१ क्युसेक पाणी मिसळत आहे. कराड व पाटण तालुक्यात अचानक ढग दाटून येऊा पावसाच्या सरी कोसळतच आहेत.  
कोयना जलाशयाची जलपातळी २,१६३ फूट ३ इंच तर, पाणीसाठा १०४.८२ (९९.५९) टक्के आहे. दरम्यान, धरणातून आवक पाण्याइतकाच विसर्ग करून पाणीसाठा नियंत्रित राखताना, धरणाखालील कृष्णा, कोयना नद्यांना पूर येऊ नये यांची दक्षता घेतली जात आहे. दिवसभरात धरणक्षेत्रात केवळ १४ मि.मी. पाऊस झाला आहे. आज सकाळी ८ वाजेपर्यंत गेल्या २४ तासात धरणक्षेत्रातील कोयनागर विभागात ४३ एकूण ४,६३५, नवजा विभागात १७ एकूण सर्वाधिक ५,५१८ तर महाबळेश्वर विभागात ५२ एकूण ४,४८० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यंदा धरणक्षेत्रात ४,८७७.६६ मि. मी. (सरासरीच्या ९७.५५ टक्के) पावसाची नोंद झाली आहे.