राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांवर टीकाटिप्पणी करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांची विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य नियुक्तीसाठी करण्यात आलेली शिफारस महाविकास आघाडी सरकारने मागे घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र विधानपरिषद चे १२ आमदारांच्या यादीतून कुणाचेही नाव वगळले नसल्याचे राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. जयंत पाटील यांनी नुकताच चाळीसगावसहीत पूरग्रस्त भागांचा पाहणी दौरा केला. यावेळी पत्रकारांशी झालेल्या चर्चेत त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले.

जयंत पाटील म्हणाले, विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या यादीत कुणाचेही नाव वगळण्यात आलेले नाही. आम्ही पुन्हा एकदा राज्य सरकारच्या वतीने राज्यपालांना विनंती केलेली आहे. तीनही पक्षांच्या सहमतीनेचं राज्यपालांना प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यावर राज्यपालांनी लवकर निर्णय घावा अशी अपेक्षा आहे. कारण लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवले जात आहेत, असे महाराष्ट्रातील जनतेला आता वाटायला लागले आहे. बराच काळ झाला त्याच्यावरचा निर्णय येत नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा – “आता मीदेखील करेक्ट कार्यक्रम करणार”; राजू शेट्टींचा राष्ट्रवादीला जाहीर इशारा

एकनाथ खडसे यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवर बोलतांना पाटील म्हणाले, ईडी या देशात विरोधी पक्षावर सतत दबाव आणण्याचा प्रयत्न करत असते.  कुणाची कोणतीही चूक नसतांना ईडी, सीबीआय या केंद्रीय यंत्रणाचा वापर विरोधी पक्षांना नामोहरम करण्यासाठी केला जातोय. त्यामुळे चूक नसतांना कारवाई करणे आणि बदनामी करणे किंवा प्रभावित करणे सूरु आहे.

हेही वाचा – “वेळा प्रत्येकाच्या येत असतात ; एकाएकाचे हिशोब चुकते करायला मी समर्थ आहे”

ओबीसी आरक्षणासंदर्भात बोलतांना जयंत पाटील म्हणाले, “स्थानिक स्वराज्य निवडणुकांपुर्वी ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा. अशी आमच्या तीनही पक्षाची भूमिका आहे. त्यासाठी सर्व पक्षीय बैठकीत साधक-बाधक चर्चा झाली आहे. त्यामुळे नवीन काही बोलण्याचा प्रश्न नाही.”