27 November 2020

News Flash

पाणी प्रश्नावरून सभा गाजली

पाणी प्रश्नावरून विरोधी पक्षांबरोबरच शेकापचे सदस्य आक्रमक

विषय समित्यांच्या सभापतींना खाते वाटप, स्थायी समिती व विविध समित्यांवरील सदस्यांची निवड, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मांडलेल्या मूळ अर्थसकंल्पाचे अवलोकन या विषयांसाठी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेचे दुपारी एक वाजता ना. ना. पाटील सभागृहात आयोजन करण्यात आले होते.

नादुरुस्त पाणी योजना, टँकर अधिग्रहण अधिकार, टँकर फ्यूअल चार्जेस, जीपीएस कनेक्टिव्हिटी, टंचाई आराखडय़ाची अंमलबजावणी यांसारख्या पाणी प्रश्नावरून गुरुवारी झालेली जिल्हा परिषदेची सर्व साधरण सभा गाजली. पाणी प्रश्नावरून विरोधी पक्षांबरोबरच शेकापचे सदस्य आक्रमक झाल्याचे दिसून आले. आयत्या वेळच्या विषयात हे प्रश्न उपस्थित करण्यात आले.

विषय समित्यांच्या सभापतींना खाते वाटप, स्थायी समिती व विविध समित्यांवरील सदस्यांची निवड, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मांडलेल्या मूळ अर्थसकंल्पाचे अवलोकन या विषयांसाठी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेचे दुपारी एक वाजता ना. ना. पाटील सभागृहात आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या पहिल्या सर्व साधारण सभेला उपाध्यक्ष आस्वाद पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. अविशान गोटे, विषय समित्यांचे सभापती, सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी, पंचायत समित्यांचे सभापती व जिल्हा परिषद सदस्य मोठय़ा संखेने उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला अभिनंदनाचे व दुखवटय़ाचे ठराव मांडण्यात आले. यानंतर विषय समित्यांच्या सभापतींना खातेवाटप करण्यात आले. अर्थ व बांधकाम विभागाचे सभापती म्हणून उपाध्यक्ष आस्वाद पाटील, कृषी व पशुसंवर्धन सभापती म्हणून डी. बी पाटील यांची तर शिक्षण व आरोग्य विभागाचे सभापती म्हणून नरेश पाटील यांची नियुक्ती झाल्याचे अध्यक्षा आदिती तटकरे यांनी जाहीर केले. यानंतर स्थायी समिती आणि इतर विषय समित्यांवरील सदस्य पदासाठी निवडणुक प्रक्रीया पार पडली. सदस्य संख्येएवढेच अर्ज आल्याने ही निवडणुक बिनविरोध झाल्याचे अध्यक्षांनी जाहीर केले. निवड झालेल्या सदस्यानांना नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले. विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेच्या सुरेंद्र म्हात्रे यांची तर सेनेच्या पक्षप्रतोद पदी मानसी दळवी यांची नियुक्ती झाल्याचे यावेळी जाहिर करण्यात आले.    जिल्हा परिषदेचा सन २०१७-१८चा यापुर्वीच मंजुर झाल्यामुळे अर्थसंकल्प जिल्हा परिषद सदस्यांच्या अवलोकनार्थ सादर करण्यात आला.

समाजकल्याण आणि कृषी विभागातील तरतुद घटल्याबद्दल यावेळी शेकापच्या निलीमा पाटील, शिवसेनेचे चंद्रकांत कोळंबे, राष्ट्रावादीच्या गीता जाधव यांनी चिंता व्यक्त केली. शेकापचे सदस्य सुरेश खैरे आणि चित्रा पाटील यांनी जिल्हा परिषदेला उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.    आयत्या वेळच्या प्रश्नात पाणी टंचाईचा मुद्दा चच्रेला आला. विरोधी पक्षा बरोबरच शेकापचे सदस्यही पाणी प्रश्नाबाबत आक्रमक झाल्याचे दिसून आले. पेण तालुक्यातील खारेपाट विभागातील पाणी टंचाईचा मुद्दा शेकापचे सदस्य प्रमोद पाटील यांनी उपस्थित केला. टँकर अधिग्रहणाचे अधिकार, टँकर इंधन चार्जेस, टँकर वरील जिपीएस कनेक्टीव्हीटी, टंचाई कृती आराखडय़ातील कामांची अमंलबजावणी, नादुरुस्त पाणी योजना यासारख्या मुद्यावर सदस्य आक्रमक झाल्याचे दिसून आले. शिवसेनेच्या चंद्रकांत कोळंबे. सुरेंन्द्र म्हात्रे, शेकपाचे सुरेश खैरे यांनी या चच्रेत सहभाग घेतला. सेनेच्या विजय भोईर यांनी जलकुंभाच्या स्ट्रक्चरल ऑडीटचा मुद्दा मांडला. सुरेंद्र म्हात्रे यांनी उमटे धरणातील नादुरुस्त टाक्यामुळे नागाव परिसरात पाणी टंचाई जाणवत असल्याचे सांगीतले. चंद्रकांत कोळंबे यांनी शासनाचा निधी मिळेपर्यंत जिल्हा परिषदेतील सेस फंडातील निधी पाणी टंचाई निवारणासाठी वापरण्याची सुचना केली.   सदस्यांनी उपस्थित केलेल्या पाणी प्रश्नाबाबत जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन तातडीने तोडगा काढण्याचे आश्वासन यावेळी अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले. शेकापचे सुरेश खैरे यांनी वैयक्तिक शौचालयांच्या अनुदानाचा मुद्दा, तर महाडचे

सभापती सीताराम कदम यांनी रोजगार हमी योजनेतील विंधण विहिरींचा मुद्दा उपस्थित केला. प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांची रिक्त पदे आणि इमारतींची दुरवस्था यावरही यावेळी चर्चा झाली. यानंतर सभा संपल्याचे अध्यक्षांनी जाहीर केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2017 1:28 am

Web Title: water scarcity in maharashtra 10
Next Stories
1 ‘लष्कराचे यांत्रिकी दळ देशाची मोठी शक्ती’
2 समुद्रात बुडून आठ जणांचा मृत्यू
3 कर्जामुळे विवाह रखडल्याने शेतकरीकन्येची आत्महत्या
Just Now!
X