26 February 2021

News Flash

रायगडातील १२४ गावे, वाडय़ा तहानलेल्या

धरणात मुबलक साठा असूनही घशाला कोरड’; अपुऱ्या, नादुरूस्त पाणी योजना कारणीभूत

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

धरणात मुबलक साठा असूनही घशाला कोरड’; अपुऱ्या, नादुरूस्त पाणी योजना कारणीभूत

मागील वर्षांत जिल्ह्य़ात सर्वत्र चांगला पाऊस झाला त्यामुळे जिल्ह्यतील २८ धरणांमध्ये ३१.१३ दशलक्ष घनमीटर इतका मुबलक पाणीसाठा शिल्लक आहे, तरीही रायगड जिल्ह्यतील १२४ गावे आणि वाडयांमध्ये  पाणीटंचाई जाणवते आहे. अपुऱ्या आणि नादुरूस्त पाणी योजना हे यामागचे प्रमुख कारण असल्याचे दिसून येते .

पावसाने चांगली साथ दिली तरीही येथील नागरिकांना पाणीटंचाईला दरवर्षी सामोरे जावे लागते, हे यावरुन दिसून येत आहे. जूनपर्यंत रायगड जिल्ह्यतील १ हजार ८१० गावे-वाडय़ांना पाणीटंचाई भासणार असे गृहीत धरून तसा  कृती आराखडा रायगड जिल्हा परिषदेने शासनाकडे सादर केला आहे.  पाणीपुरवठा विभागाच्या अकार्यक्षमतेमुळे रायगड जिल्ह्यतील २६५ पाणीपुरवठा योजना नादुरुस्त आहेत. या योजनांसाठी करोडो रुपये खर्च करुनही सबंधित गावांना आजमितीस पाणी मिळत नाही.  सावित्री, काळ, कुंडलिका, अंबा,पाताळगंगा या बारमाही वाहणाऱ्या नद्यांची पाणीपातळी अद्यापही समाधानकारक आहे. तर जिल्ह्यतील लघुपाट बंधारे विभागांतर्गत येणाऱ्या २८ धरणांमध्ये मागील वर्षांच्या   ६.१० द.ल.घ.मी. पाणीसाठा जास्त आहे. त्यामुळे जिल्ह्यचे शिवार अद्याप पाण्याने भरलेले दिसत असले तरी रायगडकरांच्या घशाची कोरड संपत नाही.  जलयुक्त शिवार योजना, वनराई बंधारे, पाणी आडवा पाणी जिरवा, विहिरींचे पुर्नजलभरण यांसारख्या योजना रायगड जिल्ह्यत मोठय़ा प्रमाणात राबवण्यात आल्या होत्या. मात्र, उन्हाळ सुरू होताच या योजना कुचकामी ठरल्याचे दिसून येत आहे.

रायगड जिल्ह्यत सरासरी ३ हजार १४२ मि.मी. पाऊस पडतो. २०१७ मध्ये जिल्ह्यत ३ हजार ४५४ मि.मी. पावसाची नोंद झाली. सरासरीच्या ११० टक्के पाऊस झाल्याने जिल्ह्यतील धरण आणि तलावांच्या पाणीसाठय़ाची पातळी टिकून राहण्यास मदत झाली आहे. जिल्ह्यतील लघुपाट बंधारे अंतर्गत येणाऱ्या उन्हेरे,पाभरे, उसरण या तीन धरणांमध्ये सत्तर टक्के, वावा, घोटवडे, ढोलशेत, कुडली,संदेरी, खिंडवाडी, अवसरे, कलोते-मोकाशी या नऊ धरणांमध्ये सुमारे ४० ते ५० टक्के उपयुक्त जलसाठा आहे.

धरणांमधील उपयुक्त जलसाठा (कंसात मागील वर्षांचा पाणीसाठा)

 • फणसाड- ०.५३३ द.ल.घ.मी. (०.४५७),
 • वावा- १.७२८ (१.५५५),
 • सुतारवाडी- १.४९५ (१.१८४),
 • आंबेघर-०.११० (०.०५०),
 • श्रीगाव- ०.६०५ (०.३१९),
 • कोंडगाव-१.४५२ (१.४८०),
 • घोटवडे- १.३१७ (०.८५८),
 • ढोकशेत- १.१३८ (०.६३०),
 • कवेळे- ०.६१३ (०.७५३),
 • उन्हेरे- १.२१० (०.८६६),
 • काल्रे- ०.६८२ (०.७१९),
 • कुडकी- ०.६८७ (०.७६९),
 • रानीवली- ०.४२५ (०.५१४),
 • पाभरे-१.२७४ (१.१४४),
 • संदेरी- ०.९१९ (०.८५२),
 • वरंध- ०.२७७ (०.२६५),
 • खिंडवाडी- ०.८५५ (०.६००),
 • कोथुर्डे- ०.५९५ (०.८००),
 • खैरे- ०.३५० (०.४६०),
 • साळोख- ०.५८० (०.४२८),
 • अवसरे- ०.९४० (०.७९१),
 • भिलवले- ०.६७० (०.२२०),
 • कलोते-मोकाशी- २.१८० (१.५३९),
 • डोणवत- १.१८० (०.८७०),
 • मोरबे- ०.७९० (१.०६०),
 • बामणोली- ०.८८० (०.३५७),
 • उसरण- १.४१० (१.२०१),
 • पुनाडे- ०.५४० (०.४४७).

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2018 1:06 am

Web Title: water scarcity in maharashtra 15
Next Stories
1 जामखेडमधील हत्या जुन्या वादातून, ५ जणांविरोधात गुन्हा दाखल
2 अहमदनगर पुन्हा हादरले; जामखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांची गोळ्या झाडून हत्या
3 नाणारवासीयांच्या संघर्षांला राहुल गांधींचा पाठिंबा
Just Now!
X