06 July 2020

News Flash

सिंधुदुर्गातील नद्या व विहीरी कोरडय़ा

उन्हाळा आल्यानंतर वन्यप्राणी, पाळीव जनावरे, माणसे नदीतील पाणी साठय़ात डुंबतात.

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील नदीपात्रे, विहीरी कोरडय़ा पडू लागल्या होत्या. गेल्या काही दिवसात उष्णतेचे वाढलेले तापमान पाहता माणासह पाळीव जनावरे आणि जंगली प्राण्यांना पाण्यात डुंबण्यासाठी पाणी साठे नसल्याचे सांगण्यात येत आहे.
उन्हाळा आल्यानंतर वन्यप्राणी, पाळीव जनावरे, माणसे नदीतील पाणी साठय़ात डुंबतात. उन्हामुळे अंगाची काहीली होत असताना पाण्यात अंघोळ केल्याने गारवा वाटतो. ग्रामीण भागात पाण्याचे साठे नदी-नाल्यांना असतात पण नदीनाल्यांची पात्रे कोरडी पडत आहेत. नदी नाल्यातील वाहते पाणी शुद्ध असल्याचे मानले जाते. त्यामुळे वाहत्या पाण्यात डुंबल्यास ठिकठिकाणी पसंती दिली जाते.
यंदा नदी, नाले, विहीरीची पात्रे कोरडी लवकरच बनली आहेत. अन्यथा मे महिन्याच्या पहिल्या पंधरावडय़ात उष्णतेचे तापमान वाढते पण यंदा एप्रिल महिन्यातच उष्णता वाढली आहे. त्यामुळे जंगलातील वन्यप्राणीदेखील पाण्याचे साठवणूक असेल तेथे धावतात.
नदी-नाल्याच्या साठवणूक असणाऱ्या वाहत्या पाण्याला वन्यप्राणी, मनुष्य व पाळीव प्राणी नक्कीच प्राधान्य देत असतात. पाळीव गाय, बैल, म्हैस, वासरूसारखे प्राणी तर पाण्याच्या डबक्यात बसून राहतात तर मनुष्य या पाण्यात अंघोळ करतात. त्याला ग्रामीण भागातील स्विमींगच म्हटले जाते.
नदी पात्रे कोरडी बनत असल्याने तो एक चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे नळपाणी योजनावरदेखील परिणाम होण्याची भिती आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2016 1:45 am

Web Title: water scarcity in sindhudurg district
Next Stories
1 महसूल कर्मचारी संघटनेची मागण्यांसाठी आंदोलने
2 रणरणत्या उन्हात पोलीस उमेदवारांची परीक्षा
3 माजलगावच्या ३२ गावांत भीषण पाणीटंचाई
Just Now!
X