मेअखेरीस उमरगा तालुक्यातील ९६ पकी ३८ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पावसाचे आगमन वेळेवर न झाल्यास टंचाईची तीव्रता अधिकच बिकट होण्याची भीती व्यक्त होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून उमरगा शहरासह तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. पारा ४० अंशावर गेल्यामुळे असह्य़ उकाडय़ाने सारेच हैराण झाले आहेत. दुसरीकडे कूपनलिका, िवधनविहिरींसह अन्य जलस्रोतांच्या पातळीत दररोज घट होत आहे. गेल्या काही दिवसांपासून पाणीप्रश्न बिकट बनला आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागात टंचाईचे चित्र अतिशय विदारक आहे. नागरिकांना घागरभर पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. कदेर, तुरोरी, गुंजोटी, काटेवाडी, नारंगवाडी, कलदेव िनबाळा आदी गावांतील ग्रामस्थांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. खास करून तुरोरी, गुंजोटी या गावांत कायमस्वरुपी पाणीपुरवठा व्हावा, या उद्देशाने सरकारकडून पाणीयोजनांवर लाखो रुपयांचा खर्च झाला. ही दोन्ही गावे लोकवस्तीने मोठी आहेत. परंतु येथील पाणीप्रश्न अजूनही कायम आहे.
तालुक्यातील ९६पकी ३८ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गुंजोटी, डिग्गी, कदेर, पळसगाव तांडा, बेळंबतांडा, चिंचोली जहागीर आदी गावांत तीव्र पाणीटंचाई आहे. पाणीटंचाईवर मात करण्याच्या उद्देशाने या गावांनी पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाकडे कूपनलिका, िवधनविहिरी अधिग्रहणांचे प्रस्ताव सादर केले. बिरुदेव मंदिर, जकेकूर, कोरेगाववाडी, गुगळगाव, मुळज, कराळी, बंडगरवाडी आदी गावांच्या परिसरातील जंगलात वन्य प्राण्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. पाण्याअभावी, मोर, लांडगे, वानर, हरीण, कोल्हा आदी प्राण्यांची ससेहोलपट होत असून, वनविभागाने वन्य प्राण्यांसाठी पाण्याची सोय करावी, अशी मागणी होत आहे.