News Flash

महापालिकांना तसा सरसकट आदेश द्यावा; मनसेची ठाकरे सरकारकडे महत्त्वाची मागणी

मनसेचे नेते बाळा नांदगावकरांनी महत्त्वाच्या मुद्द्याकडे वेधलं सरकारचं लक्ष्य

संग्रहित (Photos: Twitter/@OfficeofUT)

देशात आणि राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेनं आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे काढले. अनेक रुग्णांना बेड, ऑक्सिजनअभावी प्राण गमवावे लागले. अनेक घरातील कर्ती माणसं करोनाच्या दुसऱ्या लाटेत गेली. त्यामुळे अशा कुटुबांवर दुःखाच्या डोंगराबरोबरच आर्थिक डौलाराही कोसळला आहे. आर्थिक समस्यांना तोंड देत असलेल्या करोना पीडितांच्या कुटुंबांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं राज्य सरकार आणि महापालिकांकडे महत्त्वाची मागणी केली आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली. आरोग्य सुविधांची वाणवा निर्माण झाली. बेड, औषधी आणि ऑक्सिजनसाठी नातेवाईकांचे हाल झाले. इतकं करूनही अनेकांना आपल्या प्राणप्रिय व्यक्तींना गमवावं लागलं. यात अनेकांनी कुटुंबाचा आधार असलेल्या आणि आर्थिक डौलार सांभाळणाऱ्या कुटुंबप्रमुखांना गमावलं. तर अनेकांना जमा केलेली पुंजी कुटुंबातील व्यक्तीच्या उपचारासाठी खर्च करावी लागली. त्यामुळे ही कुटुंब आर्थिक समस्यांचा सामना करताना दिसत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी ट्विट करून एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे ठाकरे सरकारचं लक्ष वेधलं आहे.

“महाराष्ट्रातील जवळपास सगळ्याच महापालिका या श्रीमंत आहेत. अनेकांकडे हजारो कोटींच्या ठेवी आहेत. हा जनतेचा पैसा आहे आणि हा जनतेच्याच कामाला आला पाहिजे. करोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या घरच्यांना यावर्षी घरपट्टी माफ करणं गरजेचं आहे. सर्वच स्थानिक संस्थांनी हे त्वरित करून सामान्य जनतेला दिलासा द्यावा. राज्य सरकारने सरसकट तसा आदेशच द्यायला हवा. सरकारने/महापालिकांनी जनतेप्रती आपली जवाबदारी झटकू नये,” असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये उठवला जाणार लॉकडाउन; अशी आहे ठाकरे सरकारची योजना

महाराष्ट्रातील करोना स्थिती कशी आहे?

राज्यात करोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९२.५१ टक्के आहे. गेल्या २४ तासांत म्हणजे सोमवारी (२४ मे) राज्यात ४२ हजार ३२० रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आतापर्यंत बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची एकूण संख्या ५१ लाख ८२ हजार ५९२ पोहोचली आहे. तर २२ हजार १२२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. ३६१ जणांचा मृत्यू झाला असून, राज्यातील मृत्यूदर १.५९ टक्के इतका आहे. राज्यात आजपर्यंत ३ कोटी ३२ लाख ७७ हजार २९० करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ५६ लाख २ हजार १९ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. राज्यात सध्या ३ लाख २७ हजार ५८० रुग्ण उपचार घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2021 9:58 am

Web Title: wave off property tax bala nandgaonkar uddhav thackeray maharashtra govt covid 19 death family who died due to covid bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 देशमुख १०० कोटी वसुली प्रकरण : मुंबईतील पाच बार मालकांना ईडीचे समन्स
2 महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये उठवला जाणार लॉकडाउन; अशी आहे ठाकरे सरकारची योजना
3 पावसाळ्यापूर्वीच्या खरेदीसाठ ५० किलोमीटरची पायपीट