News Flash

करोनावरची लस मिळेपर्यंत तारेवरची कसरत करावीच लागेल-गडकरी

१०० टक्के लॉकडाउन आता योग्य नाही

(संग्रहित छायाचित्र)

करोनाचं संकट हे फक्त महाराष्ट्रावर किंवा भारतावर नाही तर संपूर्ण जगावर ओढवलं आहे. लॉकडाउन वाढवला गेला तर मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकट येणार आहे. त्यामुळे सगळे उपाय योजून करोनासोबत जगणं आवश्यक आहे. तसंच करोनावरची लस मिळेपर्यंत तारेवरची कसरत करावीच लागेल असं परखड मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. सोशल डिस्टन्सिंग, हात धुणे, मास्क लावणे हे उपाय योजून उद्योग सुरु करावेच लागतील असंही गडकरींनी म्हटलं आहे. माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन या एबीपी माझाच्या कार्यक्रमात त्यांनी हे मत व्यक्त केलं आहे.

१०० टक्के लॉकडाउन योग्य नाही

१०० टक्के लॉकडाउन योग्य नाही असं माझं व्यक्तीगत मत आहे असंही गडकरींनी सांगितलं. करोनाचं संकट सगळ्या जगावर आहे. प्रत्येक देशाने काय केलं आणि तिथे काय झालं ते आपण पाहिलं. लॉकडाउन करणं हा एकच रामबाण उपाय असं कुणीही ठामपणे सांगू शकत नाही. संक्रमण न वाढता आपलं जीवन सुरळीत करणं हे आव्हान आपल्याला पेलावचं लागणार आहे असंही गडकरींनी सांगितलं.  केंद्र  सरकारने दिलेल्या गाईडलाइन्स पाळून आपले व्यवसाय, व्यवहार सुरु करणं हे महत्त्वाचं आहे असंही गडकरींनी स्पष्ट केलं. करोनासोबत जगणं आपल्याला शिकावंच लागेल. समोर आलेल्या समस्येतून मार्ग काढून पुढे जावंच लागेल. आत्ताची वेळ राजकारण करण्याची नाही असंही गडकरींनी म्हटलं आहे.

भारत सरकारचा महसूलही कमी झाला आहे. कोणतंही राजकारण न करता या समस्येतून वाट काढावी लागणार आहे. जनधन योजनेत आम्ही ३८ कोटी खाती उघडली. सरकार म्हणून आम्ही जनतेच्या मागे आहोतच. आता आमची जबाबदारी संपली असं सरकारने कधीही म्हटलेलं नाही. केंद्राची जबाबदारी संपलेली नाही. आत्मविश्वासाने मोदी सरकार सगळ्यांच्या मागे उभं आहे असंही गडकरी यांनी स्पष्ट केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2020 7:21 pm

Web Title: we have to live with corona says nitin gadkari scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 फडणवीस लग्नासाठी उतावीळ, पण नवरीच मिळेना-प्रकाश आंबेडकर
2 रुग्णांना सीटी स्कॅनसाठी करावा लागतो अडीच तासांचा प्रवास
3 Coronavirus : लक्षणे नसलेल्या बाधितांना घरीच उपचार घेण्याची मुभा – पालकमंत्री
Just Now!
X