22 April 2019

News Flash

बारामतीमध्ये भाजपाचं कमळ फुलणार – देवेंद्र फडणवीस

आगामी लोकसभा निवडणुकीत ४८ जागा लढवणार आहोत. मागच्यावेळी ४२ जागा जिंकल्या होत्या. यावेळी ४३ जागा जिंकू. ही ४३ वी जागा बारामती असेल.

देवेंद्र फडणवीस

आगामी लोकसभा निवडणुकीत ४८ जागा लढवणार आहोत. मागच्यावेळी ४२ जागा जिंकल्या होत्या. यावेळी ४३ जागा जिंकू. ही ४३ वी जागा बारामती असेल. बारामतीमध्ये कमळ फुलवू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच येथे भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह पुणे, शिरुर आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील शक्ती केंद्र प्रमुखांना लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आले होते.

त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे,पालकमंत्री गिरीश बापट, पुणे शहराचे खासदार अनिल शिरोळे, शहर अध्यक्ष योगेश गोगावले तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस म्हणाले की, मागील निवडणुकीत थोड्या मताने बारामतीमधील जागा गेली. मात्र यंदाच्या निवडणुकीत बारामती मध्ये भाजपची जागा निवडून येणार. शिरुर आणि मावळ मधील जागा भाजप जिंकणार असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, देशात काही जण मुलाचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी नाव न घेता सोनिया गांधी यांच्यावर टीका केली

First Published on February 9, 2019 1:48 pm

Web Title: we will baramati loksabha seat devendra fadanvis