News Flash

शिवसेना म्हणते, “भाजपासोबत जाण्याची वेळ गेली… त्यांना शुभेच्छा”

"आठवले, जानकर, सदाभाऊ खोत याचं काय होणार माहिती नाही"

संग्रहित छायाचित्र

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी युतीबद्दलच्या केलेल्या विधानावरून शिवसेना-भाजपा एकत्र येण्याच्या विषयाची चर्चा सुरू झाली आहे. भाजपाकडून करण्यात आलेल्या विधानावर शिवसेनेनंकडून अखेर भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पाटील केलेल्या विधानाला उत्तर दिलं आहे.

आणखी वाचा- ठाकरे सरकार म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप – देवेंद्र फडणवीस

राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी करण्यात येणाऱ्या औद्योगिक उपाययोजनांची माहिती सुभाष देसाई यांनी एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात दिली. यावेळी देसाई यांना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानासंबंधी प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना देसाई म्हणाले, “नाही. ती वेळ आता निघून गेली. जेव्हा हात पकडलेलाच होता, तेव्हा त्या हाताला प्रेमानं थोपटण्याऐवजी त्या हाताला झिडकारण्याचा प्रयत्न झाला. त्रास देण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा ती वेळ गेलेली आहे. आता नको. आता त्याऐवजी आम्ही तीनजण एकत्र येऊन, परस्परांवर विश्वास ठेवून तीन पक्षांचं सरकार चांगलं काम करतंय आणि पुढची दिशा ठरलेली आहे. त्यामुळे त्याच दिशेनं आम्ही पुढं जाणार. जुन्या मित्रांना त्यांचा जो काही मार्ग असेल… त्यांनी ते कबूल केलेलं आहे की, आम्ही आता एकटे लढणार. माझ्या शुभेच्छा आहेत, त्यांना. अर्थात त्यांच्या बरोबरचे काही पक्ष जवळ आलेले होते. आठवले, जानकर, सदाभाऊ खोत याचं काय होणार माहिती नाही. कारण भाजपा एकटं लढणार आहे. आम्ही तिघे एकत्र आहोत आणि एकत्र राहणार,” असं देसाई म्हणाले.

आणखी वाचा- शुभ बोल रे नाऱ्या… राज ठाकरेंच्या वक्तव्यावर सुभाष देसाईंची टीका

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?

“बिहारमध्ये नितीशकुमार व लालूप्रसाद यादव यांनी एकत्र निवडणूक लढवली, पण तात्त्विक मतभेदामुळे नितीशकुमार यांनी राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी पुन्हा भाजपबरोबर सत्ता स्थापन केली. महाराष्ट्रातील स्थिती अशीच काहीशी झालेली आहे. महाविकास आघाडीतील या पक्षांशी शिवसेना आणि ठाकरे यांचे जमेलच असे नाही. ठाकरे यांचे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी आजही चांगले संबंध आहेत. काही वेगळी परिस्थिती निर्माण झाली तर ते थेट केंद्रीय नेतृत्वाशी बोलू शकतात. त्यामुळे भविष्यात राज्य आणि हिंदुत्वाच्या हितासाठी शिवसेनेला सोबत घेऊन आम्ही सरकार स्थापन करू शकतो. अशी सत्ता स्थापन करण्यास आम्ही तयार आहोत,” असं पाटील यांनी म्हटलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2020 1:22 pm

Web Title: we will not alliance with bjp shivsena clear stand bmh 90
Next Stories
1 उद्धव ठाकरेंकडून अपेक्षा पूर्ण होत नाहीत, खूप संभाळून पावले उचलतात – देवेंद्र फडणवीस
2 बीडमधील धक्कादायक घटना, व्हेंटिलेटर बंद पडल्याने करोना रुग्णाचा मृत्यू
3 लोकप्रतिनिधींना विचारणार नाही या मानसिकतेतून काम व्हायला नको : देवेंद्र फडणवीस
Just Now!
X