सातारा शहरात मध्यवस्तीत जिल्हा विशेष शाखेने कारवाई करून, सुमारे ११ तलवारींसह इतर हत्यारे जप्त केली. सातारा येथे गुरुवारी (दि. २९) मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. या घटनेने नागरिकांच्यात भितीचे वातावरण पसरले आहे.

गुरुवारी रात्री जिल्हा विशेष शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी विभुते व भोसले हे सातारा शहर परिसरात गस्त घालत असताना दिव्यानगरी ते कोंडवे रस्त्यावर गोवर्धन कॉलेज चौकात यावेळी एकजण संशयास्पद परिस्थितीत फिरताना आढळला. त्याला हटकले असता तो बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या आड जाऊन बसला, त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या यानंतर पोलिसांनी त्याला अडवून कसून चौकशी केली. तेव्हा त्याच्याकडे सात लांब कोयते चार धारदार तलवारी अशी रुपये १८ हजार ५०० ची ११ धारदार शस्त्रं आढळून आली.

gondia Tragic Drowning Incident, Drowning Incident, Husband and Wife dead, tirora taluka, chorkhamara village, gondia news, Drowning news,
गोंदिया : तलावात बुडून पती-पत्नीचा मृत्यू
Pune police checking, gangsters gun, 2 Incidents of Gun Violence, Gun Violence Reported in pune, firing in hadapsar, firing on jangli maharaj road, firing in pune, violence in pune, pune police, crime news, marathi news,
पुणे : गुंडांच्या झाडाझडतीनंतर शहरात गोळीबाराच्या दोन घटना,जंगली महाराज रस्ता, हडपसर भागात गोळीबार
Maharangoli of bharadhana at Godaghat to welcome the new year
नववर्ष स्वागतासाठी गोदाघाटावर भरडधान्याची महारांगोळी, सोमवारी युध्दकलेचे प्रात्यक्षिक
police committed suicide
खडक पोलीस ठाण्यात पोलीस शिपायाची बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या

पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडील ११ धारदार हत्यारे जप्त केली आहेत. आरोपीकडे सातारा पोलीस अधिक चौकशी करत आहेत. त्याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल मोरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनखाली सहायक पोलिस निरिक्षक शिवाजी विभुते, भोसले यांनी ही कारवाई केली आहे. अशा घटना वाढल्याने नागरिकांच्यात भितीचे वातावरण पसरले आहे.