News Flash

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांसाठी पुढील ४ दिवस महत्त्वाचे; हवामान विभागानं दिला अतिवृष्टीचा इशारा!

हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठीचा अंदाज वर्तवला आहे.

Weather Update, Weather Update Today
हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठीचा अंदाज वर्तवला आहे

महाराष्ट्रासाठी यंदाचा पावसाळा फारच अवघड आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. अनेकांची घरं गेली, संसार उघड्यावर पडली. आता पावसाने थोडी उघडीप दिली आहे. पण तरीही सावध आणि सतर्क राहणं आवश्यक आहे. कारण आता हवामान विभागाने राज्यातल्या काही जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठीचा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. ठाण्यात आज आणि उद्या तर मुंबईत उद्या काही भागात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर रायगड आणि रत्नागिरीमध्ये पुढचे चार दिवस अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यात पुढचे तीन दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तर कोल्हापुरात उद्या अतिवृष्टी होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने काही जिल्ह्यांत हाहाकार उडाला. पावसाने विश्रांती घेतल्यानं पूरग्रस्त जिल्ह्यांतील जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच हवामान विभागाने पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे. रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, साताऱ्यासह पुराच्या फटक्यातून सावरत असलेल्या जिल्ह्यांवर पुन्हा एकदा मुसळधार पावसाचं संकट ओढवण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने २ ऑगस्टपर्यंतची पावसाची माहिती दिली असून, यात रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूरसह इतर काही जिल्ह्यांना इशारा देण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2021 3:04 pm

Web Title: weather report of next five days heavy rainfall in some districts of maharashtra vsk 98
Next Stories
1 आमदार प्रताप सरनाईकांनी ठोकला किरीट सोमय्यांवर १०० कोटींचा मानहानीचा दावा!
2 “आजोबांचा सल्ला डावलून नातू दौऱ्यावर..,” सदाभाऊ खोतांचा शरद पवारांवर निशाणा
3 रश्मी शुक्ला यांनी मुख्यमंत्र्यांकडून फोन टॅपिंगची परवानगी घेतली होती का? नवाब मलिक यांचा सवाल
Just Now!
X