News Flash

केंद्राच्या पॅकेजचं स्वागत; जनतेपर्यंत लाभ पोहोचवणार – अजित पवार

राज्यात व देशात इमर्जन्सी आरोग्यसुविधा उभारण्यासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध झाला पाहिजे, अशी मागणीही अजित पवार यांनी केली.

(संग्रहित छायाचित्र)

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या १ लाख ७० हजार कोटींच्या पॅकेजचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत केलं आहे. महाराष्ट्र व देशासमारचं ‘कोरोना’चं भीषण संकट लक्षात घेता केंद्र सरकारकडून अशा ‘पॅकेज’ची गरज होती. या ‘पॅकेज’चे लाभ गरजूंपर्यंत पोहचवण्यासाठी राज्य शासन सर्व शक्तीनिशी प्रयत्न करेल, असा विश्वासही त्यांनी दिला.

‘कोरोना’च्या संकटाची भीषणता पाहता केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेलं १ कोटी ७० लाखांचं पॅकेज हे सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यासाठीच आहे, असं मी मानतो. यापुढच्या काळात संकट कसं वळण घेतं याचा नियमित आढावा घेऊन वेळोवेळी नवं पॅकज जाहीर होण्याची गरज आहे, असंही पवार यावेळी म्हणाले.

आणखी वाचा- बेघर, रस्त्यावर राहणाऱ्यांसाठी ‘कम्युनिटी किचन’ योजना राबवणार – अजित पवार

प्रधानमंत्री अन्न कल्याण योजना आणि डीबीटी अशा दोन माध्यमांद्वारे या पॅकेजचे फायदे जनतेला मिळणार आहेत. कोरोनाचं संकट हे तीन महिन्यांसाठी चालेल हे गृहित धरुन हे पॅकेज तयार केलं असलं तरी त्याचं वितरण तात्काळ होणं अपेक्षित आहे. राज्यात व देशात इमर्जन्सी आरोग्यसुविधा उभारण्यासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध झाला पाहिजे, अशी मागणीही अजित पवार यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2020 5:24 pm

Web Title: welcome of center package will try to being benefited to people says ajit pawar aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 बेघर, रस्त्यावर राहणाऱ्यांसाठी ‘कम्युनिटी किचन’ योजना राबवणार – अजित पवार
2 Coronavirus: “शेतकऱ्यांकडून दूध, भाजी खरेदी करण्यास नकार देणाऱ्यांवर कारवाई करा”
3 Coronavirus: राज्यात अनेक ठिकाणी दवाखाने बंद, कुटुंबीय भीतीच्या छायेत
Just Now!
X