News Flash

“मराठवाड्याच्या विकासाचा १२ आमदारांशी काय संबंध आहे?”

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ‘त्या’ विधानावर पंकजा मुंडेंनी केली जोरदार टीका

संग्रहीत छायाचित्र

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनला आजपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी वैधानिक मंडळावरून विरोधक आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी हा मुद्दा उपस्थित करत वैधानिक विकास महामंडळाची पुर्नस्थापना का केली नाही? ७२ दिवस झाले तरी सरकार का काही करत नाही? असे प्रश्न उपस्थित केले. यावर अजित पवारांनी दिलेल्या उत्तरावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस संतापले. या पार्श्वभूमीवर पत्रकारपरिषदेत बोलताना भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. मराठवाड्याच्या विकासाचा १२ आमदारांशी काय संबंध आहे? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

पंकजा मुंडे म्हणाल्या, “मराठवाड्याच्या विकासाचा १२ आमदारांशी काय संबंध आहे? त्या १२ आमदारांपैकी किती मराठवाड्यामधील आहेत? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चुकीचं वक्तव्यं केलेलं आहे. मला असं वाटतं की मराठवाडा हा मागासलेला भाग आहे. मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ नियुक्त करणं अत्यंत आवश्यक आहे. मराठवाड्याचा अनुशेष पाच वर्षे भरण्याचा आपण प्रयत्न करतोय, तरी पुढील १५ वर्षे लागतील मराठवाड्याचा अनुशेष भरण्यासाठी, ज्या पद्धतीची आर्थिक गरज मराठवाड्याची आहे, जशी मराठवाड्याची भौगोलिक रचना आहे. आणि त्याचा या १२ आमदारांशी संबंध लावणं, मला खरच कळत नाही की ही राजकीय लोकं कोणत्या बुद्धीने काम करत आहेत.”

“आम्ही भिकारी नाही,” फडणवीसांचा अजित पवारांवर हल्लाबोल

तर, “विकास महामंडळ आम्ही स्थापन करु, याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. बजेटमध्ये तसा निधी देऊ. आमचं लवकरात लवकर करायचं ठरलं आहे. पण मंत्रिमंडळाने एक निर्णय घेतला आहे ज्या दिवशी १२ आमदारांची नावं जाहीर करतील त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी आम्ही वैधनिक विकास मंडळ घोषित करु. १० नंबरी काय आणि पुढचा कोणता नंबर लावा तसं अधिवेशन करु,” असं उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैधानिक मंडळावरून उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नाला दिलं होतं.

विधान परिषदेतील १२ आमदारांच्या नियुक्तीवरुन अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा; म्हणाले…

विदर्भ आणि मराठवाड्याच्या हिश्शाचा एकही रुपया कमी न करता निधीचे संपूर्ण वाटप करण्यात येईल. वैधानिक विकास महामंडळ अस्तित्वात असल्याचे गृहित धरुन निधी वाटपाच्या सूत्रानुसार अर्थसंकल्पात विदर्भ, मराठवाड्याला संपूर्ण निधी दिला जाईल. विदर्भ, मराठवाड्याच्या सर्वकष विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून विदर्भ व मराठवाडा वैधानिक विकास महामंडळावरील नियुक्त्या लवकरच करण्यात येतील अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2021 5:36 pm

Web Title: what has the development of marathwada got to do with 12 mlas pankaja munde msr 87
Next Stories
1 “सरकार टिकवण्यासाठीच हे सगळं सुरू”, पंकजा मुंडेंची सरकारवर परखड टीका!
2 ‘एमपीएससी’ने उमेदवारांसाठी सुरू केली नवीन सुविधा
3 “मुलाच्या मतदारसंघात ‘पावरी’ होत आहे आणि आमचे मुख्यमंत्री….”
Just Now!
X