ठाणे महापालिकेच्या माजिवाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांच्या अंगरक्षकावर झालेल्या जीवघेण्या हल्ला झाल्यानंतर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपचार घेत असणाऱ्या पिंपळे यांची रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली. दुपारी एकच्या सुमारास राज यांनी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयामध्ये जाऊन पिंपळे यांची भेट घेतली. यावेळी राज यांच्यासोबत त्यांचे पुत्र अमित ठाकरे, मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष आशिष शेलार, मनसे नेते बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांच्यासोबतच इतर पदाधिकारीही होते. या भेटीनंतर राज यांनी रुग्णालयाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवादही साधला. मात्र राज यांनी पिंपळे यांना भेटीदरम्यान एका वाक्यामध्ये अगदी मोजक्या शब्दा धीर दिल्याचं समजतं.

“मी आश्वासन वगैरे काही दिलेलं नाही. मी फक्त त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायला आलो होतो. लवकर बरं व्हा एवढंच सांगितलं आहे,” असं राज ठाकरे यांनी पत्रकारांशी या भेटीनंतर बोलताना सांगितलं. तसेच फेरीवाल्यांसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता राज यांनी, “आमचं आंदोलन अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात असतं. मी काल जे म्हटलं त्याप्रमाणे, जे काही घडलं त्याचं निश्चितच दु:ख आहे. पण काळही सोकावतो. अशा प्रकारची हिंमत ठेचणं गरजेचं आहे. पोलीस त्यांची कारवाई करतच आहेत,” असं राज म्हणाले. तसेच पुढे बोलताना, “न्यायालय देखील त्यांचं काम करेल अशी आमची पूर्ण अपेक्षा आणि आशा आहे,” असंही राज यांनी म्हटलं आहे. तसेच आपण कार्यकर्त्यांची भेट घेणार नसून मुंबईला परतणार असल्याचंही राज यांनी यावेळी स्पष्ट केलं.

rajeev chandrasekhar vs shashi tharoor
तिरुवनंतपूरममध्ये राजीव चंद्रशेखर यांच्या उमेदवारीनं शशी थरूर यांच्यासमोर आव्हान; मतदारसंघात कोणाचा होणार विजय?
AAP MP Sanjay Singh
“केजरीवालांचा तुरुंगात छळ होतोय”, आप खासदार संजय सिंहांचा आरोप; म्हणाले, “त्यांच्या पत्नीलाही…”
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…

राज यांनी पिंपळे यांची भेट घेतली तेव्हा, ”तुम्ही लवकर बऱ्या व्हा. बाकी काय ते (फेरीवाल्यांचं) आम्ही बघू”, अशा शब्दात या महिला अधिकाऱ्याला धीर दिला. प्रसारमाध्यमांनी यासंदर्भातील व्हिडीओही दाखवला आहे.

मस्ती जिरवली पाहिजे…

याचसंदर्भात काल राज ठाकरे यांना पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी या फेरीवाल्याला मनसे सोडणार नाही असा इशारा दिला. “पोलिसांकडून जेव्हा तो सुटेल तेव्हा तो आमच्याकडून मार खाईल. यांची मस्ती उतरवली पाहिजे. ह्यांची जेव्हा सगळी बोटं छाटली जातील आणि यांना फेरीवाला म्हणून फिरता येणार नाही तेव्हा त्यांना कळेल. हिंमत कशी होते यांची. आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो याने काही सुधारणारे लोक नाहीत. यांची हिंमत ठेचलीच पाहिजे. सरकारी अधिकाऱ्याची बोटं छाटता? आज अटक झाली आहे उद्या जामीन मिळेल. परत दुसऱ्याची बोटं तोडायला बाहेर येतील,” असं राज म्हणाले आहेत.

नक्की काय घडलं?

गेल्याकाही दिवसांपासून ठाणे महापालिकेने रस्ते अडविणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार, महापालिकेच्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्या पथकामार्फत सोमवारी कारवाई सुरू होती. सायंकाळी ६.३० च्या सुमारास पिंपळे यांच्या पथकाने कासारवडवली येथील बाजारपेठेत भाजीविक्रेता अमरजीत यादव याची गाडी जप्त केली. त्यामुळे अमजीत याने पिंपळे यांच्या पाठीमागून येऊन त्यांच्या डोक्यावर सुऱ्याने वार करण्याचा प्रयत्न केला. हा हल्ला वाचविण्यासाठी पिंपळे यांनी सुरा पकडला. मात्र, त्यावेळी त्यांच्या डाव्या हाताची तीन बोटे कापली गेली. पिंपळे यांच्या बचावासाठी गेलेल्या त्यांच्या अंगरक्षकावरही अमरजीतने हल्ला केला. यात त्याच्याही डाव्या हाताचे बोट कापले गेले.

…अटक आणि गुन्हा

घटनेनंतर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने अत्यंत शिताफीने अमरजीतला ताब्यात घेतले. त्यानंतर महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात अमरजीत विरोधात तक्रार नोंदविली. या तक्रारीच्या आधारे, त्याच्याविरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पुन्हा कारवाई करणार…

साहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्या एका बोटाची शस्त्रक्रिया मंगळवारी पहाटे ज्युपिटर रुग्णालयात करण्यात आली.  रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सहाय्यक आयुक्तांची राजकीय नेत्यांनी भेट घेतली. आता बरं होताच पुन्हा एकदा अतिक्रमणाविरोधात धडक कारवाई करणार असं सहायक आयुक्त कल्पिता पिंगळे यांनी सांगितलं आहे.