27 September 2020

News Flash

दांडियाचा खर्च रडारवर, आरतीबाबत मार्गदर्शन घेणार

दांडियावर खर्च केल्यास तो निवडणूक खर्च म्हणून गणला जाणार आहे. देवीसमोर आरती केल्यास तो प्रचाराचा भाग मानायचा की नाही, याचे मार्गदर्शन

| September 17, 2014 01:55 am

नवरात्रोत्सवात दांडियावर उमेदवाराने खर्च केल्यास तो निवडणूक खर्च म्हणून गणला जाणार आहे. या शिवाय उमेदवाराने देवीसमोर आरती केल्यास तो प्रचाराचा भाग मानायचा की नाही, याचे मार्गदर्शन निवडणूक आयोगाकडून घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी मंगळवारी सांगितले.
प्रचारादरम्यान जातीय व धार्मिक तेढ निर्माण करणारा मजकूर वॉटस् अॅप वा फेसबुकवरून नुसता पुढे पाठविला, तरी तो गुन्हा ठरेल. अशा व्यक्तीवर माहिती-तंत्रज्ञानाचा गरवापर केल्याबाबत कलम ६६अन्वये गुन्हा नोंदविला जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
स्टार प्रचारकांच्या खर्चाचा काही भाग उमेदवारांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट केला जाणार आहे. मराठवाडय़ाच्या पातळीवर एकत्रित प्रचाराचा खर्च सर्वांमध्ये विभागला जाईल.
विधानसभा निवडणुकीतही खर्चाचा तपशील दर तीन दिवसांनी तपासला जाणार आहे. या वेळी पेट्रोलच्या दरात बदल झाल्यामुळे नव्याने खर्चाचा तपशील तपासताना तसे बदल केले जातील, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. दोन मतदारसंघांत नावे असणाऱ्यांची वेगळी यादी तयार केली जाणार आहे. त्यावर नजर ठेवण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर पद्धत अनुसरली जाईल, असेही ते म्हणाले. सिल्लोड व औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात १५ हजार नावे दुबार आल्याची तक्रार आमदार प्रदीप जैस्वाल यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. काही मतदारसंघांत ही समस्या असल्याने त्यावर बारकाईने लक्ष ठेवले जाईल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
दृष्टिक्षेपात निवडणूक तयारी
*    फुलंब्री येथे योग्य जागा नसल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचे कार्यालय चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत होणार.
*     औरंगाबाद पूर्व, पश्चिम, मध्य व फुलंब्री विधानसभेचे कार्यालय शहरात. पूर्व मतदारसंघाचे कार्यालय त्या मतदारसंघात नसून शासकीस तंत्रनिकेतन महाविद्यालयात असेल.
*     जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघांत २२ लाख ४ हजार ४६६ मतदार. मतदारयादीत नाव नोंदविण्याची उद्याही संधी.
*     ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात मतदार पावतीचे वाटप.
* हेल्पलाईनवर मतदान पावती ते पसेवाटपापर्यंत कोणतीही तक्रार दाखल होणार.
*     निवडणुकीसाठी १५ हजार कर्मचाऱ्यांची गरज. निवडणुकीतील विविध परवानगींसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातही स्वतंत्र कक्ष.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2014 1:55 am

Web Title: whats app facebook strict vigilance
Next Stories
1 तुळजाभवानीचे दर्शन : ‘बलगाडी ते ऑनलाइन’!
2 मुक्तिसंग्रामदिनानिमित्त मराठवाडय़ात ठिकठिकाणी कार्यक्रम
3 ‘सहायक अनुदानामुळे एलबीटी पूर्ण रद्द करा’
Just Now!
X