News Flash

सांगली-कोल्हापूरात पूर आलेला असताना, वाजंत्री लावून महाराष्ट्राचा दौरा करणाऱ्यांनी…. – बाळासाहेब थोरात

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या मुद्यावरून विरोधक करत असलेल्या टीकेला दिलं उत्तर

संग्रहीत छायाचित्र

राज्याचे महसूलमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी अवकाळी पावसामुळे विरोधकांकडून राज्य सरकारवर केल्या जात असलेल्या टीकेला उत्तर दिले आहे. सांगली-कोल्हापूरात पूर आलेला असताना, वाजंत्री लावून महाराष्ट्राचा दौरा करणाऱ्यांनी तरी अवकाळी पावसाचं राजकारण करू नये, असं त्यांनी म्हटलं आहे.

”सांगली-कोल्हापूरात पूर आलेला असताना, वाजंत्री लावून महाराष्ट्राचा दौरा करणाऱ्यांनी तरी अवकाळी पावसाचं राजकारण करू नये. सगळ्यांनी मिळून शेतकऱ्याला मदत कशी करता येईल याकडे लक्ष द्यावे. भाजपा नेत्यांनी दिल्लीला जाऊन मदत आणावी. आम्ही त्यांचं कौतुक करू.” असं महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ट्विट केलं आहे.

आणखी वाचा- मुख्यमंत्र्यांनी थिल्लरपणा करु नये म्हणणाऱ्या फडणवीसांना जयंत पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले…

तसेच, ” GST चा परतावा हा राज्याचा हक्काचा पैसा आहे. सर्वात जास्त टॅक्स भरणारे राज्य महाराष्ट्र आहे. मात्र सप्टेंबर अखेरपर्यंत राज्याचे ३० हजार कोटी केंद्राकडून येणे बाकी आहे. आधी केंद्राने राज्याचे हक्काचे पैसे द्यावेत.” अशी देखील त्यांनी मागणी केली आहे.

आणखी वाचा- “उद्धव ठाकरेंनी फडणवीसांसारखा दौरा करु नये”

दरम्यान, राज्यात परतीच्या पावसाने बसलेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापुरचा दौरा करत विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं. नुकसानीचे पंचनामे सुरू झाले असून ते पूर्ण होऊन संपूर्ण माहिती येताच प्रत्यक्ष मदत दिली जाईल, असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2020 5:58 pm

Web Title: when there was flood in sangli kolhapur those who visited their with band balasaheb thorat msr 87
Next Stories
1 दहावी, बारावीच्या फेरपरीक्षांचे वेळापत्रक जाहीर
2 सावधपणे निर्बंध हटविण्याची मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्यच!
3 महिलांना लोकल प्रवास करू द्यावा, राज्य सरकारची रेल्वे बोर्डाला पुन्हा विनंती
Just Now!
X