News Flash

जिथे भाजपा तिथे मृतांचे आकडे लपवण्याचा खेळ सुरू; नवाब मलिकांची भाजपावर टीका

भाजपासारखे आकडे लपवण्याचे काम आम्ही करत नाही अशी टीका मलिक यांनी केली आहे

सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन केल्यानं महाराष्ट्रात करोना आटोक्यात - नवाब मलिक

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील करोना संख्येवरुन विरोधकांकडून राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. राज्यात असुविधांमुळे रुग्णसंख्या वाढल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यावर आता राज्याच्या अल्पसंख्यांक मंत्र्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. जिथे भाजपाचे सरकार आहे तिथे मृतांचे आकडे लपवण्याचा खेळ सुरू आहे. आमचा कारभार पारदर्शक आहे. भाजपासारखे आकडे लपवण्याचे काम आम्ही करत नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

राज्यात करोना मृतांची संख्या एक लाखापर्यंत पोहोचली असून हे महाविकास आघाडी सरकारचे पाप असल्याची टीका भाजपाने केली होती. त्यावर नवाब मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राज्यात पहिल्या दिवसापासून करोना रुग्णांची नोंद केंद्र सरकारच्या नियमानुसार पारदर्शकपणे करण्यात आली आहे. संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्य एकमेव आहे जिथे मृतांच्या आकड्यांची नोंद पारदर्शकपणे झाली आहे असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.

नवाब मलिकांनी सांगितलं महाराष्ट्रात करोना आटोक्यात आल्याचं कारण, म्हणाले….

महाराष्ट्रात करोनावर नियंत्रण मिळवण्यावर यश

“आम्ही कुठलेही आकडे लपवलेले नाही. जी परिस्थिती आहे ती जनतेसमोर ठेवली आहे. ७० हजार दरदिवशी केसेस येत असताना राज्यात हॉस्पिटलमध्ये जागा नाही किंवा ऑक्सिजन मिळाला नाही अशा बातम्या आल्या नाहीत. त्यामुळे करोनावर नियंत्रण मिळवण्यात महाराष्ट्र व मुंबई मॉडेल जगभर प्रसिद्ध झाले आहे,” असेही नवाब मलिक म्हणाले.

‘ब्लू टीक’वरून नवाब मलिकांनी मोदी सरकारला लगावला टोला; म्हणाले…

उत्तर प्रदेशातील नदीतील मृतदेहांवरुन टीका

“एकट्या उत्तर प्रदेशमध्ये ५ ते ६ लाख लोकांनी आपला जीव गमवावा लागला आहे. काहींचे मृतदेह अक्षरशः नदीत सोडण्यात आले तर काही ठिकाणी नदीकिनारी भगव्या वस्त्राच्या कफनात लपटलेले मृतदेह पडलेले पहायला मिळाले. गुजरातमध्ये आणि बिहारमध्येही मृतांचे आकडे लपवण्यात आल्याचे समोर आले आहे. भाजपाला बोलण्याचा अधिकार आहे परंतु आम्ही महाराष्ट्रात भाजपसारखे मृतांचे आकडे लपवले नाहीत,” असे मलिक यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2021 7:54 pm

Web Title: wherever the bjp governance is playing the game of hiding the death toll nawab malik abn 97
टॅग : Corona,Coronavirus
Next Stories
1 “देर आये दुरुस्त आये”, पंतप्रधान मोदींना राष्ट्रवादीचा टोला
2 “पंतप्रधानांनी दोन अतिशहाण्या मुख्यमंत्र्यांना लायकी दाखवली”; भाजपा आमदाराची टीका
3 ….आता कानाच्या बुरशीजन्य संसर्गाचा धोका
Just Now!
X