हर्षद कशाळकर, अलिबाग

रुचकर चव आणि औषधी गुणधर्मामुळे नावारूपाला आलेल्या अलिबागच्या पांढऱ्या कांद्याच्या काढणीस  यांदा सुरुवात झाली असून हा कांदा आता विक्रीसाठी बाजारात येऊ लागला आहे. लहान कांदा १२० रुपये माळ तर मोठा कांदा १५० रुपये माळ अशा दराने सध्या हा कांदा विकला जात आहे.

Torrential rain with hail in Shirol and Hatkanangle taluka
शिरोळ, हातकणंगले तालुक्यात गाऱ्यांसह वळिवाची दमदार हजेरी; उन्हात गरव्याची सुखद अनुभूती
nashik water crisis marathi news,
नाशिक जिल्ह्यात तहानलेल्या गावांच्या संख्येत वाढ, आठवडाभरात ५७ गावे-वाड्यांची भर; धरणसाठा २८ टक्क्यांवर
Maharangoli of bharadhana at Godaghat to welcome the new year
नववर्ष स्वागतासाठी गोदाघाटावर भरडधान्याची महारांगोळी, सोमवारी युध्दकलेचे प्रात्यक्षिक
Who is throwing stones at houses since a month
अद्भूत! एक महिन्यापासून घरांवर दगडफेक, कोण करतंय?

अलिबाग तालुक्यातील प्रामुख्याने नेहुली, खंडाळे, काल्रे, तळवली या गावांमध्ये पांढऱ्या कांद्याचे पीक घेतले जात असे. त्यानंतर आलिबाग तालुक्यात इतरही गावांमध्ये पांढऱ्या कांद्याची लागवड शेतकरी करू लागले.  पूर्वी अलिबाग तालुक्यात १०० हेक्टरवर पांढऱ्या कांद्याची लागवड होत असे. यंदा अलिबाग तालुक्यात २४५ हेक्टरवर पांढऱ्या कांद्याची लागवड करण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्यात खरीप हंगामात भात पिकाची मोठय़ा प्रमाणात लागवड होत असते, मात्र रब्बी हंगामात सिंचन क्षेत्र वगळता फारशी पिके घेतली जात नाहीत. जिल्ह्यात ओलिताखालील क्षेत्र फारसे नसल्याने दुबार आणि तिबार शेती जवळपास केली जात नाही. गेल्या काही वर्षांत ही  परिस्थिती बदलण्यास सुरुवात झाली आहे. भात कापणीनंतर जमिनीतील ओलावा दोन महिने टिकत असल्याने पांढरा कांदा यासारख्या पिकांची लागवड करण्यास सुरुवात केली आहे.

या कांद्याला वाढती मागणी आणि चांगली किंमत मिळत असल्याने गेल्या काही वर्षांत लगतच्या गावात पांढऱ्या कांद्याची लागवड केली जाऊ लागली. मागील वर्षी २९० हेक्टरवर पांढऱ्या कांद्याची लागवड करण्यात आली होती.

लहान कांदा १२० तर मोठा १५० रुपये माळ

या वर्षी पांढऱ्या कांद्याच्या लागवडीचे क्षेत्र घटले आहे. यंदा केवळ अलिबाग तालुक्यात २४५ हेक्टर क्षेत्रावर पांढऱ्या कांद्याची लागवड करण्यात आली आहे. यंदा पाउस उशिरापर्यंत पडल्याने पाणी मुबलक होते. सध्या लहान कांदा १२० रुपये माळ तर मोठा कांदा १५० रुपये माळ अशा दराने पांढरा कांदा विकला जात आहे.