प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या. ही भेट का झाली असेल याबाबत वेगवेगळी समीकरणं मांडली जाऊ लागली. ज्याप्रमाणे प्रशांत किशोर अचानक सिल्वर ओकवर शरद पवार यांना भेटले त्याचप्रमाणे ते २०१९ च्या निवडणूकांपूर्वी अचानक मातोश्रीवर गेले होते. त्यावेळीसुद्धा राजकीय सारवासारव झाली होती. मात्र नंतर काय घडलं ते सर्वश्रुत आहेच. त्यामुळे या भेटीकडे राजकीयदृष्ट्या दुर्लक्ष करून चालणार नाही. अर्थात राजकीय वर्तुळात इतके दखलपात्र असणारे प्रशांत किशोर नेमके आहेत तरी कोण? याचा आम्ही वेध घेण्याचा प्रयत्न केला.

sp leader shreya verma
उत्तर प्रदेश विजयासाठी सपाने कसली कंबर; गोंडातील बेनी प्रसाद वर्मांच्या नातीला दिली उमेदवारी
Vijay Wadettiwar slams bjp leader chandrashekhar bawankule
‘छोटे पक्ष संपवा’, चंद्रशेखर बावनकुळेंच्या विधानावर विजय वडेट्टीवारांची टीका; म्हणाले, “खून करण्याचे..”
AAP and Congress will fight together
आप आणि काँग्रेस दिल्लीत भाजपाविरोधात एकत्र लढणार, पण गुजरात, आसाम अन् गोव्याचे काय?
Sanjay Raut Narendra Modi Putin
“आमच्यावर विषप्रयोग करून…”, पुतिन यांचा दाखला देत संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना टोला; म्हणाले, “प्रखर बोलणाऱ्यांविरुद्ध…”

आता प्रशांत किशोर यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर त्यांच्यापाठोपाठ राज्यातले आणि देशातले राजकीय वारे देखील पवारांच्या भेटीला जातात का? हा राजकीय तर्क-वितर्कांचा आणि तेवढाच राजकीय चर्चांचा विषय ठरेल!