News Flash

…मग सरकार सर्जिकल स्ट्राईकचे श्रेय कशाला घेते; उद्धव ठाकरेंचा गडकरींना सवाल

नितीन गडकरींचे वक्तव्य ऐकून तळपायाची आग मस्तकात गेली

उद्धव ठाकरे (संग्रहित छायाचित्र)

नौदलाच्या अधिकाऱ्यांना आम्ही सत्ताधारी आहोत, असे सुनावणारे केंद्रीय नितीन गडकरी आणि त्यांचे सरकार भारतीय सैन्याच्या सर्जिकल स्ट्राईकचे श्रेय कसे काय घेते, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला. ते मंगळवारी मुंबईत शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते. यावेळी त्यांनी भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांना फटकारणारे केंद्रीय बंदरमंत्री नितीन गडकरी यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांनी मलबार हिल येथे तरंगता धक्का (जेट्टी) उभारण्याच्या प्रस्तावाला परवानगी नाकारल्यावरून नौदलाच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली होती. नौदल अथवा संरक्षण मंत्रालय म्हणजे सरकार नव्हे, तर केंद्रामध्ये सरकार आहे आणि आम्ही त्यात आहोत, असेही त्यांनी यावेळी म्हटले होते. तसेच त्यांनी यावेळी एक किस्साही सांगितला होता. काही महिन्यांपूर्वी नौदलाचे अधिकारी घरांसाठी दक्षिण मुंबईमधील भूखंड मागण्यासाठी आले होते. त्यांना मुंबईतच घर कशासाठी हवे? त्यांची खरी गरज सीमेवर आहे. त्यामुळे नौदलाच्या अधिकाऱ्यांच्या घरासाठी मुंबईत एक इंचही जागा देणार नाही, असे गडकरींनी म्हटले होते.

नौदलाला घरांसाठी मुंबईत एक इंचही जागा देणार नाही!

गडकरींच्या या वक्तव्याचा उद्धव ठाकरेंनी आजच्या भाषणात समाचार घेतला. सरकार म्हणून इतकाच टेंभा मिरवायचा असेल तर मग सरकार सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे श्रेय का घेते? असा सवाल त्यांनी विचारला. श्रेय घ्यायचेच असेल तर तुम्हीच सीमेवर बंदुका घेऊन लढायला जा. पण तुम्ही कसले देशासाठी प्राण देणार? नुसती ५६ इंचाची छाती असून उपयोग नाही. त्या ५६ इंचाच्या छातीत शौर्यच नसेल तर काय उपयोग? जर नौदलाच्या अधिकाऱ्यांचे काही चुकलेच असेल तर त्यांना चार भितींच्या आतमध्ये समज द्यायला पाहिजे होती. मात्र, देशासाठी प्राण देणाऱ्या सैनिकांचा अवमान करायचा सत्ताधाऱ्यांचा मस्तवालपणा पाहून तळपायाची आग मस्तकात जाते, असे उद्धव यांनी म्हटले.

गडकरींच्या वक्तव्यात सत्तेचा दर्प

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2018 1:41 pm

Web Title: why modi government take credit of surgical strike done by indian army asks uddhav thackeray
Next Stories
1 दावोसमध्ये नरेंद्र मोदींच्या जेवणात ‘घर का स्वाद’; १ हजार किलो मसाले स्वित्झर्लंडमध्ये
2 गाय मारण्याप्रमाणेच थापा मारणंही पाप – उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका
3 विमानातील WiFi चे दरही असणार हायफाय
Just Now!
X