देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत असून देशात सर्वात महाग पेट्रोल परभणीत असल्याचे सांगितले जाते. परभणीत बुधवारी पेट्रोलचे दर प्रति लिटर ९०. ०५ रुपये तर डिझेलचे दर प्रतिलिटर ७८ रुपये इतके आहे. परभणीत पेट्रोल व डिझेल इतके महाग का ?, असा प्रश्न सर्वांनाच पडलाय. यााचा घेतलेला हा आढावा…

परभणीत पेट्रोल व डिझेल येते कुठून?
परभणीत पेट्रोल व डिझेल मनमाड डेपोमधून येते. परभणी जिल्हा पेट्रोल व डिझेल असोसिएशनचे अध्यक्ष अमोल भेडूस्कर यांनी ‘हिंदूस्तान टाइम्स’ला ही माहिती दिली. मनमाडपासून परभणी हे ३२० किलोमीटर अंतरावर आहे.

..म्हणून दर जास्त
मनमाड डेपोवरुन टँकरने पेट्रोल व डिझेल परभणीला आणले जाते. यादरम्यान एकूण चार टोलनाके येतात. पेट्रोल व डिझेल जिल्ह्यात आणण्यासाठी येणारा खर्च जास्त आहे. वाहतुकीवरील खर्च वाढल्याने पेट्रोल पंपचालकांना जास्त दर आकारावे लागतात.

औरंगाबादपेक्षा जास्त दर
औरंगाबादपासून परभणी २०० किलोमीटर अंतरावर आहे. मात्र, तरी देखील पेट्रोल व डिझेलसाठी परभणीकरांना औरंगाबादपेक्षा ६५ पैसे जादा मोजावे लागतात.