महाराष्ट्र सरकार सनातन संस्थेवर बंदी का घालत नाही असा प्रश्न उपस्थित करत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र सरकारने केंद्राला केली होती. मात्र एखादी संघटना किंवा संस्थेवर बंदी घालायची असल्यास त्यासाठी इतर राज्याचा अभिप्राय घ्यावा लागतो. त्या प्रक्रियेमुळे बंदीचा निर्णय राहिला. मात्र विचारवंतांच्या हत्या लक्षात घेऊन भाजपा सरकारने या संस्थेवर बंदी का घातली नाही? असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला.

पाहा व्हिडिओ

महाराष्ट्र सरकार या प्रकरणात बोटचेपी भूमिका घेत असून सनातन संस्थेबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी.अशी मागणीही पृथ्वीराज चव्हाण यांनी  केली. पुण्यातील काँग्रेस भवन येथे प्रदेश अध्यक्ष माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती.त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सनातन संघटनेबाबत भूमिका मांडली.

यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की,आघाडी सरकारच्या काळात आम्ही सनातनवर बंदी घालण्याची मागणी केंद्राकडे मागणी केली होती.त्यानंतर डॉ नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली.या हत्या प्रकरणी खंडेवाल आणि नागोरी ची नाव समोर आली.त्याला काही काळ होत नाही. तोपर्यंत रविंद्र तावडे आणि आता सचिन आंदुरे ही अशी नावे समोर येत आहे.नरेंद्र दाभोलकर ते गौरी लंकेश हत्या प्रकरण लक्षात घेता.दररोज किंवा दिवसांनी नवीन नावे समोर येत आहे.त्यामुळे मुख्य सुत्रधारापर्यंत  पोहचणार कधी आणि या विचारवंतांच्या मारेकऱ्याना शिक्षा मिळणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.