विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून चंद्रपूरमध्ये विवाहितेने पतीवर कुऱ्हाडीने वार केल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. या घटनेनंतर महिलेनेही नदीत उडी मारुन आत्महत्या केली असून पत्नीच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पतीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चंद्रपूरमधील घुग्गूस नकोडा येथे अर्चना सोयाम आणि बबन सोयाम हे दाम्पत्य राहत होते. अर्चनाला पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता. यावरुन पती- पत्नीमध्ये वाद व्हायचे.  बुधवारी रात्री देखील सोयाम दाम्पत्यामध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. गुरुवारी पहाटे पती बबन हे गाढ झोपेत असताना अर्चनाने त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार केला. आरडाओरडा ऐकून स्थानिकांनी सोयाम दाम्पत्याच्या घराच्या दिशेने धाव घेतली असता हा प्रकार समोर आला. यानंतर अर्चनाने घराजवळील पुलावर जाऊन नदीत उडी मारुन आत्महत्या केली.  पत्नीच्या हल्ल्यात बबन सोयाम हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर चंद्रपूरमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.