14 August 2020

News Flash

बेळगावात पतीचा मृतदेह एकटीने हातगाडीवरुन नेऊन पत्नीने केले अंत्यसंस्कार

करोनामुळे माणुसकी केव्हाच मागे पडली आहे

रात्री झोपेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कार करण्यासाठी शेजारी,नातेवाईक यांनी पाठ फिरवली.शेवटी पत्नीने हातगाडीतून आपल्या पतीचा मृतदेह एकटीने नेल्याची दुर्दैवी घटना बेळगावातील अथणी गावात शुक्रवारी पाहायला मिळाली.

करोनामुळे माणुसकी केव्हाच मागे पडली आहे. मृतदेह अंत्यसंस्कारासाठी चार जण लागतात पण चार लोक देखील करोनाच्या दहशतीमुळे येईना झालेत. अथणी येथील सदाशिव हिरट्टी (५५) याचा गुरुवारी रात्री मृत्यू झाला. सदाशिव मृत झाल्याची घटना शेजारी ,नातेवाईक यांना समजली. शेजारी,नातेवाईक आले पण कोरोनामुळे मृत्यू झाला असेल म्हणून सगळ्यांनी दुरून अंत्यदर्शन घेतले आणि निघून गेले.

मृतदेह तिथेच राहिला.शेवटी सदाशिवच्या पत्नीने निर्धार केला आणि पतीचा मृतदेह कापडात गुंडाळला.मृतदेह कापडात गुंडाळून हातगाडी आणली.हातगाडीत त्या दुःखी पत्नीने मृतदेह उचलून ठेवला.नंतर गावातील रस्त्यावरून हातगाडी घेऊन पत्नीने स्मशानात मृतदेह नेला.सगळे बघत राहिले पण एकही त्या पती गमावलेल्या महिलेच्या मदतीला आला नाही.शेवटी स्मशानात देखील पत्नीनेच पतीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 18, 2020 10:08 am

Web Title: wife carried her husbands deadbody alone on the handcart in belgaon nck 90
Next Stories
1 महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस नाही; सरकार आपणहूनच पडेल : देवेंद्र फडणवीस
2 ‘दिशा कायदा’ ही केवळ घोषणाचं होती का?; चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल
3 भर रस्त्यात पोलिसाशी हुज्जत; संबंधित तरूण विनायक राऊतांचा मुलगा असल्याचा निलेश राणेंचा दावा
Just Now!
X